महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ०८ ऑगस्ट रोजी राज्यभर “निर्भय वाॅक” चे आयोजन !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा. अंगद कांबळे ]
20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यामध्ये सकाळी वाॅक ला गेलेल्या डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्यावर पाठीमागून येवून गोळ्या झाडल्या. या घटनेला या वर्षी 8 वर्ष पूर्ण होत आहेत .
या 8 व्या स्मृतिदिन निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे राज्यभर निर्भय वाॅक चे आयोजन केले आहे. तसेच पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना निवेदन दिले जाणार आहे.
रायगड जिल्ह्यात सुद्धा प्रत्येक तालुक्यात अश्या निर्भय वाॅक चे आयोजन केले असून समविचारी संघटना व कार्यकर्ते यांनी या निर्भय वाॅक मध्ये सहभागी होऊन डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन करावे असे आवाहन म्हसळा शाखेच्या वतीने अध्यक्ष नवाज नजीर, कार्याध्यक्ष जयसिंग बेटकर व प्रधान‌ सचीव रुपेश गमरे यांनी केले आहे.
सकाळी 7 वाजता पाभरे फाटा‌ येथून कोरोना प्रतिब॑धाचे सर्व नियम पाळून या निर्भय वाॅक ला सुरुवात होईल.
त्यानंतर प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना म्हसळा पोलिस निरीक्षक यांचे मार्फत निवेदन दिले जाईल.
तसेच रायगड जिल्ह्याच्या वतीने या दिवशी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत जिल्ह्यातील समविचारी संघटना व कार्यकर्ते यांचा आँनलाईन अभिवादन व निर्धार मेळावा घेतला जाणार आहे.
यात सुद्धा सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष विनयकुमार सोनवणे यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या