सौ.नीता दमकोंडवार (दरबस्तेवार) जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
येथून 5 किमी अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली केंद्र कुंडलवाडी ता. बिलोली येथील सहशिक्षिका सौ .नीता सुधाकरराव दमकोंडवार (दरबस्तेवार) यांना नुकतेच नांदेड येथील कुसुम सभागृहात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा नांदेड यांच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार– 2022 देऊन सन्मानित करण्यात आले.
सदरील पुरस्कार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर, पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेड ,राज्यपाल नियुक्त विद्यापीठ सदस्य प्रा.डाॅ.अनिल कुलकर्णी, जि. प .चे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. डॉ. सविता बिरगे, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्यकारी अध्यक्ष मधुकरराव उन्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधान करण्यात आले.
सदरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बिलोली पंचायत समितीच गटशिक्षणाधिकारी बी. एम. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. भैरवाड ,केंद्रप्रमुख वाय .एस .कौठकर,केंद्रीय मु.अ. नारायण वाघमारे  शाळेचे मु.अ. आय. एच .झंपलकर, विषय तज्ञ गुणवंत हलगरे, सुरेश राठोड, चिरली गावच्या सरपंच सौ. ज्योत्स्ना शरद मेहरेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशव बोंबले व सर्व सदस्य यांच्यासह गावातील नागरिक व कुंडलवाडी केंद्रातील सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या