अतिक्रमण काढण्यासाठी पालीकेची नोटीस ; इंद्रजित तुडमे यांच्यासह नोटीसचे उत्तर देण्यासाठी न.प.मुख्यधिकाऱ्यांना निवेदन.

[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
बिलोली शहर नगर पालीकेच्या हद्दीतील शासकीय /गायरान जमीनीवर गोरगरीब नागरिकांचे अतिक्रमण काढण्यासाठी पालीकेची नोटीस मिळाली आहे. सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित तुडमे यांच्या सह नोटीसचे शासन दरबारी उत्तर देण्यासाठी न.प.मुख्यधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

बिलोली शहरातील मध्यभागी भास्कर नगर आहे. येथे निराधार, वृध्द महिला व पुरुष गेल्या ४० ते २५ वर्षापासुन शासकीय/गायरान जमीनवर घर बांधुन आपले व जिवन व्यतीत करत आहेत. शासन नियमानुसार न.प.चे कर, पाणी नळ पट्टी व तहसिल कार्यालयाचे महसूल भरणाऱ्यां नागरीकांचे अतिक्रमन काढण्यासाठी उच्च न्यायालयाचे आदेशानुसार बिलोली येथील पालिकेचे मुख्यधिकारी यांनी नागरीकांना बेघर करण्यासाठी नोटीस दिली आहे.
या नोटीसमुळे निराधार, विधवा महिला, वयोवृद्ध नागरीकांची झोप उडाली आहे.  कार्यकर्त्यांच्या मदतिने उपविभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देऊन आपली व्यथा ऐकावली आणि न्याय मागीतला आहे.
 नंतर इंद्रजित तुडमे यांनी तहसिल कार्यालयासमोर नागरीक, विधवा महिला, बेघर होऊ नये म्हणून या गरीब नागरीकांची व्यथा शासनापर्यंत मिडीयाच्या माध्यमातून पोहचवावी असे मत मांडले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या