नसोसवायएफचे सततचे निवेदन,पाठपुरावे आणि चर्चेने बार्टीची एमफिल पीएचडी फेलोशिप जाहिरात निकाली !

नांदेड; दि.२८||
नँशनल एससी/ एसटी/ ओबीसी स्टुडंट अँन्ड युथ फ्रन्ट (नसोसवायएफ) च्या विद्यार्थी नेत्यांनी सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांची भेट घेऊन निवेदन देत डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र(बार्टी) तर्फे अनुसुचित जाती प्रवर्गातील एम.फिल/ पि.एचडि च्या प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांंना फेलोशिप साठी अर्ज मागवण्यात यावे ह्यासाठी चर्चा केली.
संशोधक विद्यार्थी नेत्यांनी संशोधक फेलोशिप ची मागणी मान्य करावी व लवकरात लवकर जाहिरात काढावी अशी मागणी केली असता तात्काळ जाहिरात काढू असे आश्वासन ना. धनंजय मुंडे यांनी चर्चे अंती दिले होते. तेच अश्वासन त्यांनी ४८ तासाच्या आत खरे करून मान्यत: दिली असून २०१९ व २०२० च्या एम.फिल./पि.एचडी. प्रवेशित विद्यार्थ्यांंसाठी डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र(बार्टी) ची जाहिरात काढली आहे.
राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हित संवर्धनासाठी तसेच संशोधनास संशोधनकर्त्यास वाव मिळवा यासाठी राज्य सरकारने डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र(बार्टी) ची फेलोशिप सुरु केली होती. परंतु कोरीना कोविड-19 मुळे बार्टी फेलोशिपची जाहिरात काढण्यात आली नव्हती. ना. मुंडे यांच्या सोबत नसोसवायएफ पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली तसेच सामाजिक न्यायमंत्र्यांनी ते गांभीर्याने घेऊन २४ तासाच्या आत फेलोशिपची जाहिरात काढून अर्ज मागविले आहेत.
त्यामुळे नँशनल एससी/एसटी/ओबीसी स्टुडंट अँन्ड युथ फ्रन्ट (नसोसवायएफ) च्या निवेदनाला यश आले आहे. या चर्चेत सहभागी संघटन पदाधिकारी प्रा. सतिश वागरे, स्वप्निल नरबाग, संदिप जोंधळे, मनोहर सोनकांबळे, प्रविण सावंत, अनुपम सोनाळे हे होते तसेच सर्व नसोसवायएफ च्या कार्यकर्त्यांचे चे हे यश आहे. त्यामुळे नेहमी विद्यार्थी,शिक्षण,संशोधन,समाज या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात आवाज उठवणाऱ्या अग्रेसर नसोसवायएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ डी हर्षवर्धन यांच्या भूमिकेचे व त्यांच्या सहकारी टीमचे राज्यातील सर्व विद्यार्थी,पालक या सर्व स्थरातून कौतुक करण्यात येत आहे. या पुढेही आमची अशीच न्याय मिळवून देणारी भुमीका असून शिक्षण,संशोधन ह्या प्रक्रियेत समाज,राष्ट्र,विद्यार्थी यांच्या हितासाठी व संवैधानिक हक्क अधिकारासाठी आमचा लढा सुरूच राहील असे मत नसोसवायएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ डी. हर्षवर्धन यांनी या पाठपुराव्याला आलेल्या यशाबद्दल व्यक्त केले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या