राष्ट्रीय सैनिकी स्कुल निवड परीक्षेत ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, खैरगावचा चा विद्यार्थी हर्षवर्धन कांबळे चमकला !

( नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी )
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मार्फत घेतल्या जाणाऱ्या ऑल इंडिया राष्ट्रीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा २०२२ साठी खैरगाव तालुका नायगाव येथील ग्रीन व्हैली ईंटरनॅशनल शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थी हर्षवर्धन कांबळे ने घवघवीत यश संपादन करून शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत चमकवल्याने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अत्यंत अवघड आणि संपूर्ण देशभरातील मुलांचा सहभाग असलेली ही परीक्षा दिनांक २८ फेब्रूवारी २०२२ रोजी घेण्यात आली होती. त्यात शाळेतील हर्षवर्धन कांबळे यांनी ही परीक्षा दिली होती. ही परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाल्याने त्याची निवड राष्ट्रीय सैनिकी स्कूल सातारा या ठिकाणी झाली आहे. देश संरक्षणाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या प्रत्येक तरुणांसाठी ही एक महत्त्वाची परीक्षा असते. हर्षवर्धनचे या परीक्षेतेतील यश हे त्याच्या स्वप्नपूर्तीतील पहिले यशस्वी पाऊल आहे.
त्याच्या या यशाबद्दल ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, खैरगांव, या संस्थेचे सचिव कुमुदकांत पटेल यांनी हर्षवर्धनचे भरभरून कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सरोज धरणे यांनी शाल श्रीफळ देऊन त्याचा सहपरिवार यथोचित सत्कार केला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, कर्मचारी यांनी त्याच्या यशाचे कौतुक केले व भविष्यातील स्पर्धा परीक्षेत अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून शुभेच्छा दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या