महाराष्ट्रात ओबीसी ची जातनिहाय जनगणना करावी – शिवानंद पांचाळ यांची मागणी

२०२१ च्या जनगणनेत ओबीसींची जातीनिहाय जनगणना केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनाने राज्यात जातिनिहाय जनगणना करावी :- सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी केली मागणी

नायगांव प्रतिनिधी :- ३ नोव्हेंबर २०२०

२०२१ या वर्षात होऊ घातलेली जातीनिहाय जनगणना केन्द्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील सर्व ओबीसी.प्रवर्ग निहाय अनु.जाती.अनु.जमाती या प्रवर्गप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणनेत लोकसंख्या एकूण जाहीर करून, लोकसंख्या नुसार ओबीसी समाजास न्याय मिळवून द्यावे अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री मा.अजित पवार,मा.छगन भुजबळ मा. विजय वडेट्टीवार मा.नानाभाऊ पटोले राज्यातील सर्व मंत्री सर्व आमदार मा.सचिव महाराष्ट्र राज्य यांना मा.तहसीलदार नायगांव बाजार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

 

या वेळी सामाजिक कार्यकर्ते संभाजी शंकरराव पांचाळ, बाळू ईबीतवार ईकळीकर सचिन सुरेशराव फुलारी अदी कार्यकर्ते उपस्थित होते.

५२ टक्के असलेल्या ओबिसी समाजास संविधानीक तरतुदी नुसार ज्या सोयी सवलती व सुविधा मिळावयास पाहीेजे त्या स्वातंत्र्यापासुन अजुनपर्यंत सुरु करण्यात आलेल्या नसल्याने संपुर्ण महाराष्ट्र राज्याच्या ओबिसी समाजावर अन्यात होत आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर आमच्या चॅनल शी बोलताना खंत व्यक्त केले आहे..

ताज्या बातम्या