माजी नगराध्यक्षा सौ.मैथिली कुलकर्णी यांच्या हस्ते सैफ पटेल फ्रेंड्स क्लब संपर्क कार्यालयाचे उदघाटन !

संकटाने ग्रासलेल्या व्यक्तीची समस्या सोडवण्यासाठी “सैफ पटेल फ्रेंड्स क्लब” सदैव तयार राहिल – अध्यक्ष सैफ पटेल यांचे आश्वासन !

(बिलोली ता.प्र – सुनिल जेठे)
बिलोली येथील सामाजिक कार्यकर्ता सैफ पटेल यानी दि.४ मार्च रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदु,मुस्लिम,सिख,ईसाई एकता रॕली व भाईचारा रॕली काढून विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थिती मध्ये माजी नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते सैफ पटेल फ्रेंड्स क्लब संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

 बिलोली/कुंडलवाडी बाजार येथे सैफ पटेल फ्रेंड्स क्लब बिलोली च्या वतीने सामाजिक कार्यकर्ता सन्मान व सत्कार करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सैफ पटेल यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्म गुरु आनंद भंतेजी तर प्रमुख पाहूणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अन्सारी खांन नांदेड व बिलोली नगरीचे माजी नगराध्यक्षा सौ.मैथिली कुलकर्णी यांचे उपस्थिती होती.

तद्नंतर सामाजिक कार्याबद्दल मार्गदर्शन व सामाजिक कार्य कश्याला म्हणतात? सामाजिक कार्य म्हणजे काय असते ? हे सविस्तर माहिती सांगतांना कोरोना च्या काळात सय्यद रियाज, मारोती भालेराव, आर्शद देसाई, सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित तुडमे यांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती आपल्या भाषनातून सांगितली.
तर सैफ पटेल फ्रेंड्स क्लब अध्यक्ष सैफ पटेल यांनी प्रस्तावनेमध्ये बोलतांना नवयुवक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्य करण्यासाठी मोठ्या उत्साहाने एकत्र येऊन सैफ पटेल फ्रेंड्स क्लब ला जोडले गेले आहेत, आम्ही गोर-गरीब आणि गरजू लोकांच्या समस्या सोडवत आहोत असे ते म्हणाले.
यावेळी नांदेडचे सामाजिक कार्यकर्ते अन्सारी खान, मुफ्ती आयुबसाब मौलाना, माजी नगराध्यक्षा सौ.मैथिली कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित तुडमे, आनंद भंतेजी, सामाजिक कार्यकर्ते, गौसोद्दिन कुरेशी, मौलाना, माजी नगराध्यक्ष नागनाथ तुम्मोड, माजी तलाठी माधव जाधव, माजी नगरसेवक नितिन देशमुख, शेख सुलेमान, शेख नवाब, वलिओद्दीन फारुखी, मुबिन मौलाना, शेख इलियास, मोहिब लाला, अब्दुल आमेर कुरेशी, समिर पटेल, ईम्रान देशाई, आझर पठान, शेख बशिर, ईम्रान पटेल, शेख सलमान, मोहमद रिझवान, इंमरान देशाई यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते व सैफ पटेल फ्रेंड्स क्लब चे नवयुवक सदस्य उपस्थित होते. तर सुञसंचलन ईरशाद मौलाना इनामदार यांनी केले होते.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या