उच्चभ्रु लोकांचे आईवडील वृद्धाश्रमात शेतकऱ्यांचे नाहीत – बालाजी बच्चेवार 

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
उच्चभ्रु लोकांचे आई वडील हे वृद्धाश्रम मध्ये राहतात परंतु गरिब शेतकरी यांचे आई वडील हे शेतकरी यांच्या जवळ राहतात त्यामुळे उच्चभ्रु लोकांनी आई वडीलांची काळजी घ्यावी असे आवाहन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे. ते वासवी माता जयंती निमित्त स्व. बायानाबई जवादवार यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

नायगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारोती राजेश्वर कत्तुरवार व प्रदीप जीवनराव देमेवार यांच्या पुढाकारातून वासवी माता जयंती निमित्त स्व. बायानाबई जवादवार यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ आर्य वेश्य समाजातील नोदंनीकृत जेष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. वसंतराव चव्हाण, सदानंद उध्दवराव मेडेवार (उद्योगपती) नांदेड, ज्येष्ठ नागरिक गणेश सा. बचेवार, सौ. शाशिकलाबई गोविंदराव पांपटवार, भागवत सावकार प्रतापवार, संगमनाथ साव. कावटीकवार, पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर, गजानन चौधरी, व्हॉईस ऑफ मीडिया चे तालुकाध्क्ष नागेश पाटील कल्याण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी वासावी माता कन्यका देवीच्या प्रतिमेचे पूजन व आरती मान्यवारांच्या यांच्या शुभ हास्ते करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांचा शाल ट्रॉफी व माळ देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास आर्य वैश्य समाजातील बहुसंख्य महिला, पुरुष व तरुणांची मोठी उपस्थिती होती. श्रीनिवास व्यंकटी जवादवार, वसंत व्‍यंकटी जवादवार, सुधाकर व्यंकटी जवादवार व समस्त जवादवार परिवाराने सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यथा शक्ती परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुरेख संचालन सहशिक्षक नलबलवार सर यांनी केले.
यावेळी बोलताना बच्चेवार म्हणाले की, कुठल्याच शेतकऱ्यांचे आई वडील वृद्धाश्रमात आढळणार नाहीत पण उच्चंभू लोकांचे आईवडील अधिक प्रमाणात आज वृद्धाश्रमात आहेत. आई वडील म्हणजे मुलांसाठी संस्काराची शिदोरी असतात. आई वडीलांशिवाय जगण्याला बळ येत नाही मी आज जे काही घडलो वाढलो ते माझ्या आई वडिलांची कृपा आहे. आपल्यालाही वृद्धापकाळ येणारच आहे त्यासाठी त्यांची काळजी घ्या मनोभावे सेवा करा. असे विचार माजी जिल्हा परिषद बालाजी बाच्चेवार यांनी व्यक्त केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या