जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी नायगाव येथे ढोल ताशा गजर आंदोलन, गजर अंदोलनाने तहसील परिसर दणाणला.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यभर सरकारी कर्मचारी आंदोलन करत आहेत याचाच एक भाग म्हणून नायगाव समन्वय समितीच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला दि.१७ मार्च २०२३ रोजी नायगाव तहसील कार्यालयासमोर ढोल ताशा गजर आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले असून यावेळी सदर मागणीचे निवेदन नायगाव चे तहसीलदार मा.गजानन शिंदे यांच्याकडे देण्यात आले.

        जुनी पेन्शन योजना मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाचा आज चौथा (पाचवा)दिवस असून यामध्ये नायगाव तालुक्यातील तहसील कार्यालय,पंचायत समिती कार्यालय, आरोग्य विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, आयटीआय कर्मचारी, पाठबंधारे विभाग, राज्य शासनाचे सर्व कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे दि.१७ मार्च २०२३ रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ढोल ताशा गजर आंदोलन करण्यात आले.
यामध्ये नायगाव तहसील परिसर अक्षरशः दणाणून गेला यावेळी श्री टी जी पाटील रातोळीकर तालुकाध्यक्ष ग्रामसेवक संघटना नायगाव , सचिव सुर्यकांत बोंडले , नागेश यरसनवार , साईनाथ चव्हाण , सदाशिव आगलावे, सदाशिव नामदेव जाधव (जि.प.), भोसले पी.ए.(कोषाध्यक्ष.म.रा.प.हक्क संघटना), सोनटक्के एस.एम.(तालुकाध्यक्ष.म.रा.जु.पे., एस.के.मुंडे (तलाठी संघटना), आर.जे‌.चव्हाण (कृषी साहाय्यक संघटना), श्रीमती एस.आर.बोधगिरे, श्रीमती एस.आर.कुमनाळे, सदाशीव जाधव सर, मंगेश हनवटे, उद्धव ढगे सर, कपील गारटे, अशोक कदम, निलेश कुलकर्णी यासह ग्रामसेवक, तलाठी शिक्षक, कृषी सहाय्यक , आरोग्य कर्मचारी, महसुल, पंचायत चे तालुक्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या