नांदेडचा गिर्यारोहक ओमेश पांचाळ युनाम शिखर चढाईसाठी रवाना !
(विषेश प्रतिनिधी – शिवानंद पांचाळ नायगांवकर) दि.२२ जुलै
नांदेड – येथील शिक्षक असलेले गिर्यारोहक ओमेश पांचाळ हे दिनांक २२ जुलै २०२१ रोजी हिमाचल प्रदेशातील माऊंट युनाम शिखर चढाईसाठी गुरूवारी सचखंड एक्सप्रेसने रवाना झाले आहेत. युनाम शिखर हे हिमाचल प्रदेशातील मनाली पासून साधारण २५० किलोमीटर अंतरावर असलेला लाहौल या अतिदुर्गम भागातील ६१११ मीटर उंच असलेले कठीण श्रेणीतील शिखर आहे.
याआधी ओमेश पांचाळ यांनी हिमालयातील कांचनगंगा बेस कॅम्प,स्टोक कांगरी,एव्हरेस्ट बेस कॅम्प,काला पत्थर,रूपकुंड, फ्रे शिखर आदी शिखरे सर केली असून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण त्यांनी दार्जिलिंग व लदाख येथून घेतले आहे.तसेच सह्याद्रीतील वेगवेगळे कडे आणि सुळके यावर त्यांनी प्रस्ततारोहणाचा सराव केला आहे.या मोहिमेसाठी त्यांच्यासोबत देशाच्या वेगवेगळ्या भागातून आठ जण सहभागी होणार आहेत.
२४ ते ३१ जुलै दरम्यान ते ही मोहीम फत्ते करणार आहेत.त्यांच्या या शिखर मोहिमेसाठी त्यांना लाॅयन्स क्लब नांदेड,नांदेड नेचर क्लब व भारतीय जैन संघटना यांचे सहकार्य लाभणार आहे.यावेळी लाॅयन्स क्लब नांदेड चे अध्यक्ष शिवप्रसाद टाक,हर्षद शहा,नांदेड नेचर क्लबचे अतिंद्र कट्टी,निसर्ग मित्र मंडळाचे प्रमोद देशपांडे,लक्ष्मण मदने,राजाभाऊ राजेवार, दत्तात्रय पाटील,शिवराम पांचाळ यांनी तिरंगा ध्वज हाती देऊन ओमेश पांचाळ यांना त्यांच्या युनाम शिखर मोहिमेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
www.massmaharashtra.com