रायगड जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागला !

[ रायगड प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
रायगड रायगड जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसात 88 नवे कोरोना रुग्ण आढळून आले कोरोना रुग्णांची संख्या वरचेवर दुपटीने वाढतच असल्या मूळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
ओमीक्रोनाचे राज्यात रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाली आहे त्याच बरोबर रायगड जिल्ह्यात 88 रुग्णांपैकी 75 हे तर पनवेल तालुक्यात आहेत व बाकी 13 रुग्ण माणगाव, महाड, रोहा, खालापुर, पेण असे आढळून आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही पनवेल तालुक्यात रुग्ण जास्त आढळून आले होते व इतर तालुक्यात ही रुग्ण संख्या दिसून आली ओमिक्राँण आणि डेल्टा परिवर्तनामुळे आगमी काळ तिसऱ्या लाट येण्याची सूचना आरोग्य संघटनेने वर्तविले आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यात सुरु झालेली रुग्ण वाढ रायगड कराना धोक्याची सुचना होय.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या