माझी वसुंधरा अभियानांतर्गत कुंडलवाडी नगरपरिषदेला एक कोटीचे बक्षीस ;

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
          माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत विभागीय स्तरावर विशेष कामगिरी केल्याबद्दल कुंडलवाडी नगर परिषदेला एक कोटीचे बक्षीस राज्य शासनाकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे,या यशाबद्दल मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे..
         पृथ्वी,जल,वायू,अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि. २ ऑक्टोबर २०२०पासून राबविण्यास सुरुवात झाली. माझी वसुंधरा ३.० हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा ३.० मध्ये राज्यातील ४११ नागरी संस्थांनी सहभाग घेतला होता. या अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन व फील्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणामार्फत करण्यात आले. या मूल्यमापनाच्या आधारे लोकसंख्येनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.त्यामध्ये
 कुंडलवाडी नगर परिषदेला १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटात औरंगाबाद विभागातून प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आहे तर राज्य शासनाकडून नगरपरिषदेला १ कोटी रुपयाचे बक्षीस मिळाले आहे
          मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांचे योग्य मार्गदर्शन व काटेकोर नियोजनामुळे नगर परिषदेला हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वीही स्वच्छ सर्व्हेक्षण २०२२ मध्ये केंद्र सरकारकडून मुख्याधिकारी ठोंबरे यांना विशेष पुरस्कार देउन गौरविण्यात आले होते. माझी वसुंधरा अभियान ३.० साठी डॉक्युमेंटस् तयार करणे व डेस्कटॉप असेसमेंट पास करण्यासाठी वंकर सहाणे (शहर समन्वयक) यांनी काम केले ,फील्ड वरील नियोजन करणेसाठी धोंडीबा वाघमारे व सर्व सफाई कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 
    नगरपरिषद अधीक्षक सुभाष निरावार, राम पीचकेवार, मुंजाजी रेनगडे, विरसेन सिरसाठ, प्रतीक माळवदे, बालाजी टोपाजी, गंगाधर पत्की, प्रकाश भोरे, हेमचंद्र वाघमारे, मारोती करपे, शंकर जायेवर, मोहन कंपाळे, जनार्दन भोरे, भरत काळे आदी कर्मचाऱ्यांनी अभियान काळात विशेष कर्तव्य बजावले आहे….

–   प्रतिक्रिया  –

तत्कालीन मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, माजी सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, शाळा व शहरातील नागरिक यांची सजगता यामुळे हा पुरस्कार नगर परिषदेला मिळाला आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या