कुंडलवाडी सोसायटीतर्फे शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
      येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतर्फे शहर व परिसरातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात येत असलेल्या समस्यांचे मार्गदर्शन व खरीप हंगाम पूर्व नियोजन यासाठी १४ जून रोजी सोसायटीच्या प्रांगणात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी, कृषीतज्ञ व बँकेचे अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

                      या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून आ.जितेश अंतापुरकर, माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार,बाळासाहेब पाटील खतगावकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, आनंदराव बिराजदार,राजेश्वरराव उत्तरवार, बँक ऑफ बडोदाचे शाखाधिकारी ज्ञानेश्वर शेंगुळे, सहायक निबंधक सुनील गन्लेवार, व प्रमुख मार्गदर्शक म्हणून देगलूरचे उपविभागीय कृषी अधिकारी सुरेंद्र पवार, सगरोळी कृषी विज्ञान केंद्राचे कृषी तज्ञ व्यंकटराव शिंदे,नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक एम. टी.शिंदे,बिलोली चे तालुका कृषी अधिकारी जे.डी.पवार,शास्त्रज्ञ डॉ. कृष्णाजी अंभोरे,एस.एल.बोरगावे आदींनी या कार्यशाळेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया संरक्षण कसे करावे कसे करावे शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वती मातेचे पूजन करून तसेच सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै.आ.जयरामजी अंबेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आले.
          कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार,व्हाईस चेअरमन गंगाधर नरावाड व सर्व संचालक,मॅनेजर राम रत्नागिरे,कृषी सल्लागार साहेबराव डोंगरे, सोसायटीचे कर्मचारी,काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आदी जणांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन सुनील बेजगमवार, सूत्रसंचालन प्रा.गोपाळ चौधरी यांनी केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या