आंतरभारती शिक्षण संस्थेत ‘एक पेड मा के नाम’ हा उपक्रम ; विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपणाच्या संदर्भात जनजागृती !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
        येथील आंतर भारती शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालय व आंतरभारती माध्यमिक विद्यालय या शाळेत सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दिनांक 22 रोजी वृक्षारोपण करण्यात आले आहे.
           केंद्र व राज्य शासनाच्या वतीने वृक्ष लागवड ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने सामाजिक वनीकरण विभाग बिलोलीच्या वतीने दिनांक 15 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान ‘एक पेड मा के नाम ‘ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने दिनांक 22 रोजी शहरातील आंतरभारती माध्यमिक विद्यालय व पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालय या शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी विविध जातीच्या वृक्षाचे वृक्षारोपण केले आहे. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती करून वृक्षाचे संगोपन करण्याचे संकल्प केला आहे. 
              यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जयमाला पटणे,मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर, वनीकरण विभागाचे सहाय्यक वनपाल मसियोदिन काजी,वनपाल फरीद शेख,आदीसह शाळेचे शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या