कुंडलवाडीत खुल्या व्यायाम शाळेचे उदघाटन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
     क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेतून नगरपालिका अंतर्गत असलेल्या के रामलू मंगल कार्यालयातील प्रांगणात खुल्या व्यायाम शाळेचे उदघाटन दिनांक 12 रोजी सकाळी दहा वाजता मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.

      कुंडलवाडी शहरातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसापासून खुल्या व्यायाम शाळेची मागणी प्रलंबित होती,याच मागणीच्या अनुषंगाने नगरपरिषदेने शहरातील नागरिकांचे आरोग्य, स्वास्थ, सुरक्षित रहावे व सर्व स्त्री-पुरुषांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी या हेतूने के. रामलू मंगल कार्यालयात खुल्या व्यायाम शाळेचे उदघाटन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.

सदरील व्यायाम शाळा ही उद्या पासून शहरातील सर्व स्त्री पुरुषांना सकाळ संध्याकाळ मोफत असून याचा योग्य उपयोग नागरिकांनी करावा असे आवाहन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोबरे यांनी केले आहे.
यावेळी या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, वैद्यकीय अधिकारी विनोद माहुरे, माजी नगरसेवक शेख मुखत्यार, पत्रकार राजू लाभशेटवार, कल्याण गायकवाड, हर्ष कुंडलवाडीकर, संतोष चव्हाण, रुपेश साठे, सिद्धार्थ कांबळे, अशोक हाके, कार्यालयीन अधीक्षक सुभाष निरावार, मारोती करपे, मोहन कंपाले,धोंडीबा वाघमारे, भरत काळे, शंकर जायेवार, शुभम ढिल्लोड,रामा वाघमारे, रोहित हातोडे, उमाकांत शिंदे, आदिसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते..
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या