अर्जापुर येथील पानसरे महाविद्यालयात मुक्त विद्यापीठ परीक्षा सुरळीत सुरू

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
      येथून जवळच असलेल्या अर्जापुर येथील पानसरे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा दि.३० मे पासून सुरळीतपणे सुरू झाले आहेत. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी संस्थेचे सचिव सुनील बेजगमवार यांनी परीक्षा केंद्रास भेट देऊन योग्य त्या सुचना व्यवस्थापनाला दिले.
             यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेस दि.३० मे पासून सुरुवात झाली. अर्जापुर येथील पानसरे महाविद्यालयात ३० मे पासून परीक्षा सुरळीतपणे सुरु झाली. या परीक्षा केंद्रावर प्रथम ,द्वितीय व तृतीय वर्षाचे असे एकुण दिड हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत.वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून डॉ. अर्जुनसिंह ठाकुर यांचि नियुक्ती विद्यापीठाने केली आहे.परीक्षा केंद्रास संस्थेचे सचिव सुनील बेजगमवार यांनी ३० मे रोजी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्राचार्य अशोक श्रीरामे,केंद्रप्रमुख डॉ. आर.जे.गायकवाड,केंद्रसंयोजक प्रा.गोविंद बैलके,तांत्रिक समन्वयक डॉ. राजेश सोनकांबळे,पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू लाभशेटवार,संजय पाटील खुळगे,कुणाल पवारे आदी जण यावेळी उपस्थित होते. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे…..

ताज्या बातम्या