मुख्य बाजारपेठेत सुरू होत असलेल्या बारला नागरिकांचा तीव्र विरोध !

महिलांचा नगरपलिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा !
[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील मुख्य बाजारपेठेत नवीन बियर बार चालू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून संबंधित बारला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी सरस्वती गडपवार यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सदरील जागा मुख्य बाजारपेठेत असून शहरात आठवड्यातुन दोन वेळा बाजार भरतो व बाजाराच्या लगतच मज्जिद, मंदिर असल्याने मद्यपीकडून सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शहर व परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात आठवडी बाजारात येतात. अशा मद्यपीकडून महिला, पुरुष, वृद्ध व लहान मुले आशाना अर्वाच्य भाषेत शिव्या देणे, आरडाओरड करणे, दारूच्या नशेत कुठेही लघुशंका करणे, अशा प्रकाराचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
त्यामुळे संबंधित बारला मुख्यबाजार पेठेत परवानगी प्रशासनाने देऊं नये अशी मागणी सरस्वती शिवाजी गडपवार यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. या उलट नगरपालिका प्रशासनाने संबंधित बारला परवानगी दिली तर नगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा हि देण्यात आला आहे.
 शहरातील महिलांचा मोठ्या प्रमाणात संबंधित बारला तीव्र विरोध होत असून नगरपालिका प्रशासनाने आगामी होणाऱ्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत संबंधित बारला परवानगी दिली जाते का? किंवा विरोध करणाऱ्या नागरीकांचा सन्मान ठेवला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. .www.massmaharashtra.com 

युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करा.

ताज्या बातम्या