गोरगरीब समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठीच महासभा ; महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांचे प्रतिपादन !
■■ महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची संयुक्त सभा नांदेड येथे संपन्न. महाराष्ट्र आणि विदर्भातील असंख्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती..■■
( नायगाव बाजार ता. प्रतिनिधी- गजानन चौधरी)
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने महाराष्ट्र आणि विदर्भातील गोरगरीब कुटुंबातील सर्व सामान्य समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा कार्य करीत आहे.
समाज हिताचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महासभेची यशस्वी वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी केले आहे. शनिवारी दिनांक दहा डिसेंबर रोजी नांदेड सिडको भागातील वासवी भवन येथे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची संयुक्त सभा घेण्यात आली.
या प्रसंगी ते बोलत होते
अध्यक्ष नंदकुमार गादेवार पुढे म्हणाले, काशी अन्नसत्रमच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते. महासभा महाराष्ट्र आणि विदर्भ राज्यात पोहोचली असून महासभेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात महिलांचे अधिवेशन घेऊन महिलांना देखील संधी उपलब्ध केली जाईल. गोरगरीब समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महासभा प्रयत्न करीत असून व्यापाऱ्यांची महासभा स्थापन करून त्यांना एकत्र आणून समाजातील उद्योग क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना बळ दिले जाईल सर्व समाज संघटित केला जाईल. समाज बांधवांना आरोग्य सुविधा मिळावी यासाठी राज्यात आरोग्य समितीची स्थापना केली जाईल. शासकीय योजना समाज बांधवापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. पालक मिळावे घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाईल. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तिरुपती येथे महासभेचे दुसरे अधिवेशन घेतले जाणार असून तेथे बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या भवनाचे भूमिपूजन माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी मंत्री तथा आमदार मदन येरावार व आमदार समीर कुन्नावार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यक्रम केला जाईल. समाजाची जनगणना करण्यासाठी सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी सज्ज झाले असून पंचसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज बांधवांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही नंदकुमार गादेवार यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव गोविंदराव बिडवई यांनी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा जवळपास 20 जिल्ह्यात कार्यरत झाल्याचे सांगून आता संपूर्ण भारतात कार्यक्षेत्र वाढवून एक आदर्श निर्माण करणारी महासभा होणार असल्याचे मत प्रगट केले आहे.
बांधकाम समितीचे अध्यक्ष भानुदास वट्टमवार यांनी महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सेवाभावी पदाचा वापर करावा समाजसेवेसाठी कार्य करावे. महासभेचा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले.
महासभेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी विदर्भ आणि महाराष्ट्रात महासभा स्थापन झाल्याने महासभेची शक्ती वाढली असून माझा पाया माझा समाज आहे. असे सांगितले महासभेचे संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार यांनी समाज संघटित झाल्याशिवाय संघटन मजबूत होणार नाही. यासाठी सर्व समाज बांधवांनी आप आपले हेवे दावे मतभेद बाजूला ठेवून समाज हितासाठी एकत्र यावे असे आवाहन केले.
चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल माडुरवार, नागपूरचे जिल्हा अध्यक्ष दीपक निलावार यांनीही आपले मत मांडले. याप्रसंगी महासभेचे कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तम्मेवार, सचिव संजय नारलावार, कोषाध्यक्ष संतोष संगणवार, चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ अनिल माडूरवार, सचिव राजेश्वर चिंतावार, कोषाध्यक्ष शंकर गंगाशेट्टीवार, यवतमाळचे जिल्हा अध्यक्ष संजय पालतेवार, सचिव राजेंद्र नालमवार, कोषाध्यक्ष विजय पालतेवार, नागपूरचे जिल्हाध्यक्ष दीपक निलावार, सचिव प्रशांत पिंपळवार कोषाध्यक्ष प्रसाद झिलपेलवार, राज्य कार्यकारणी उपाध्यक्ष राजू मुकावार, बांधकाम समितीचे उपाध्यक्ष राजू कुन्नावार, सुरेश रुद्रवार, परभणीचे जिल्हाध्यक्ष बालाजी दुबेवार, बीडचे जिल्हाध्यक्ष सुमित रुद्रवाड, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष सचिन गुंडेवार, लातूरचे जिल्हाध्यक्ष सुरेश पेन्शलवार, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष संजय कौलवार,जालनाचे रत्नाकर काप्रतवार, उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माणिकवार, नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विजय कुंचनवार, नांदेड शहराचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुक्कावार, पुण्याचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काप्रतवार वर्धा जिल्हाध्यक्ष अनंता भोगावार, नाशिकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बोरगावकर, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तम्मेवार, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष अनिल माडुरवार, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष संजय पालतेवार, नागपूरचे जिल्हाध्यक्ष दीपक निलावार, राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार, जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख गजानन चौधरी, प्रशांत देवशेठवार यांच्यासह महाराष्ट्र आणि विदर्भातील महासभेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी कन्यका परमेश्वरी आणि आराध्य दैवत परमपूज्य रंगनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बंडेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेंद्र येरावार यांनी केले आहे.
Www.massmaharashtra.com