नायगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व स्वंरोजगाराच्या मेळाव्याचे आमदार राजेश पवार यांनी केल आयोजन.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील नवतरुण रोजगारांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र प्रदेश मंगल प्रभात लोढा, मंत्री कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्य यांच्या प्रयत्नातून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व बेरोजगार मेळावाचे आयोजन तालुक्याचे आमदार राजेश पवार यांनी केले आहे.
सदरील मेळावा नायगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक 27 एप्रिल गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत असून आमदार सदरील मेळावा राजेश पवार यांच्या प्रयत्नातून आयोजित केला असून या मेळाव्यात 1. नोकरीसाठी संधी व नामांकित उद्योग कंपनी, 2. कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण, 3. स्टार्टअप व उद्योजक्तासाठी मार्गदर्शन, 4. अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदणी, 5. बायोडाटा कसा लिहावा मुलाखत कशी द्यावी याचे प्रशिक्षण, 6. स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध महामंडळाच्या कर्ज योजनाची माहिती, मुद्रा लोन योजना, आयोजित केलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार हमी रोजगार मेळाव्यास रोजगारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन नायगाव मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या