बिलोली तालुक्यातील युवकांनी आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे -पांडुरंग मामीडवार.

शिक्षित युवकांमध्ये सुद्धा आर्थिक साक्षरतेचा अभाव आहे.परिणामी वित्ताची जमवाजमव करत असताना तारेवरची कसरत करावी लागते. सरकारच्या खाजगीकरनाच्या धोरणाचा मोठा फटका सरकारी नोकऱ्यांच्या उपलब्धतेवर होत आहे.आणि आजची शैक्षणिक व्यवस्था ज्ञानार्थी युवक घडवण्याच्या ऐवजी केवळ नोकरीला केंद्रीभूत मानून शिकणारी पिढी तयार करत आहे.परिणामी सरकारी नोकरी शिवाय अर्थार्जन करण्याची क्षमता युवकांमध्ये विकसित होत नाही.

म्हणुन आम्ही 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त तालुक्यातील युवकांना आर्थिक साक्षरतेचा धडा देण्यासाठी एक दिवसीय शिबिर आयोजित केले आहे.

या प्रसंगी आर्थिक सल्लागार तथा व्यावसायिक प्रशिक्षक आर.डी जोगदंड हे शिबिरार्थीना प्रशिक्षण देणार आहेत.तरी जास्तीत जास्त युवकांनी या शिबिरात सहभागी होऊन आपले आर्थभान विकसित करावे.

दिशा केंद्र बिलोली येथे 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्व नाव नोंदणी करणे अनिवार्य असून .इच्छुकांनी संयोजकांशी 9850409004,9765160358 या भ्रमणध्वनीद्वारे आपले नाव नोंदवून सीट पक्की करवून घ्यावी.असे आवाहन पत्रकाद्वारे प्रतिष्ठानचे प्रवक्ते पांडुरंग मामीडवार,अध्यक्ष कमलाकर जमदाडे,सचिव गौतम भालेराव, उपाध्यक्ष मोहन जाधव,पंचफुला वड्डे, शेषराव जेठे,राहुल भालेराव, ऍड आकाश सोनकांबळे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या