निसर्गाच्या घटकावर पावसाच्या पाण्याचा अंदाज कळतो – पंजाब डख !!

घुंगराळ्यात शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत सुगावे च्या नियोजनात शेतकरी मेळावा संपन्न.
 [ नायगाव तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
निसर्गाच्या घटकावर पावसाच्या पाण्याचा अंदाज आधारित असून गावरान आंब्याला बहार जास्त येऊन रसाळी जास्त झाली की दुष्काळ तर व चिंचेला फळ जास्त लागले पावसाचे प्रमाण जास्त ही फळाच्या झाडाची लक्षणं वर्ष भराच्या पावसाचा अंदाज देतात तर सरड्या सारख्या सरपटणाऱ्या प्राणी सुध्दा आपल्या तुर्याच्या लाल रंगावरून पावसाचे प्रमाण दाखवून जातो.या निसर्गातील घटकांचा अभ्यास करून त्याला विज्ञानाच्या सांगडीत बसवून मी केलेला भौगोलीक अभ्यास हा मला आज एका विश्वासू हवामान तज्ञा पर्यंत नेऊन पोहचविला असून, ही शक्ती अभ्यासाने प्राप्त झाली असे विचार प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी घुंगराळा येथे उपस्थित शेतकऱयांना मार्गदर्शन करताना केले.  

     ते पुढे म्हणाले सात जुन ला मृग नक्षत्रावर पावसाळा सुरुवात होण्या ऐवजी २२ दिवस दरवर्षी पुढे जात असून या मानाने दरवर्षी हिवाळा व उन्हाळा ही पुढे जात आहे. या बदलत्या मोसमाच्या विचार करून शेती करावे.असे विचार डख यांनी व्यक्त केले येत्या 12,13, व 14 जानेवारीला पाऊस असून त्या आगोदर थँडी आहे याचा विचार करून शेतकऱ्यांनी रब्बी पिकाकडे लक्ष द्यावे असे सांगून हरभरा पिकातील मर लागलेली झाडे उपडून काढून टाकावीत असे आवाहन केले. 

     फळबाग व भाजीपाला तज्ञ . अमोल मलकापुरे यांनी शेतकऱयांनी निसर्गाच्या विरुद्धच्या दिशेने शेतीत फळबाग भाजीपाला न घेता कीड नियंत्रणाच्या दृष्टीने योग्य पद्धतीने योग्य वेळी योग्य पद्धतीने फळ बाग व भाजीपाला शेती करावी असे आवाहन करून काही चित्रफीत दाखवून शेतीच्या लागवडीची पद्धती बदल मार्गदर्शन केले…
      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घुंगराळा येथे दिं.22 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वा. घुंगराळा येथील कृषिरत्न हायटेक नर्सरी येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन मेळाव्यात महाराष्ट्रातील सुप्रसिध्द हवामान तज्ञ पंजाबराव डख व अकोला येथील फळबाग व भाजीपाला तज्ञ. अमोल मलकापुरे यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. 

●● शेतकर्‍यांच्या खिशात पैसा आला तर शेतकरी मोठा होईल – आशाताई भिसे ●●

 शेतकर्‍यांच्या खिशात पैसा आला तरच शेतकरी मोठा होईल, त्यासाठी शेतकर्‍यांन बरोबर आमच्या माता भगिनींना ही शेतीविषयक नवे तंत्रज्ञान पटवून देणे काळाची गरज आहे असे वाटते, या मेळाव्याचे उत्तम नियोजन वसंत सुगावे यांनी केले आहे. मेळाव्यातून होणारे शेतकरी हित लक्षात घेता असे शेतकरी मेळावे राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात घेण्यात यावीत असे त्या म्हणाल्या.

●● नायगावचा शेतकरी प्रगतशील व्हावा, यासाठीच कृषी मेळाव्याचे आयोजन –  वसंत पाटील सुगावे. ●●

      माझ्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा गावाच्या शेजारील बहुतांश भाग कोरडवाहू असल्याने येथील बहुतांश शेतकरी निसर्गावर आधारित पारंपरिक शेतकरी करतात पण या कृषी मेळाव्या च्या माध्यमातून माझ्या शेतकरी यांत्रिक शेती व प्रगतशील शेती करावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवुन देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अशा तिसर्‍या कृषी मेळाव्याचे आयोजन केले यात राजकारण हा हेतू नसून माझा शेतकरी पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणे प्रगतशील शेती करावा हा उद्देश आहे त्याच बरोबर या ठिकाणी तालुक्यातील बरीच सरपंच मंडळी उपस्थित आहे गावाच्या व आपल्या परिसराच्या विकासासाठी पक्षीय राजकारण बाजूला सारून एकत्रित आलो तर परिसरातील अनेक विकासकामे आपणास सहजरीत्या करणे शक्य होईल असे वसंत सुगावे यांनी आपल्या प्रास्ताविकातुन व्यक्त केले.
या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर होते. मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हानिरीक्षक आशाताई भिसे यांच्या हस्ते करण्यात आले. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, डॉ. विक्रम देशमुख तळेगावकर, लक्ष्मीकांत पद्मवार, गजानन पापंटवार,सुभाषराव रावनगावकर, धर्माबाद तालुकाध्यक्ष हणमंत पा. जगदंबे, ,,मुखेड तालुकाध्यक्ष शिवाजीराव जाधव, गोणारकर,चोळाखेकर,छोटू पाटील बाभळीकर, ,सरपंच रणजित पा.हिवराळे, या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील सर्व आघाड्याचे जिल्हा पदाधिकारी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्याचे सुरेख प्रास्ताविक आयोजक तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी केले.या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी आपल्या भाषणातून केले,तर या वेळी अध्यक्षीय समारोप हरिहरिराव भोसीकर यांनी केला.संचलन हणमंत शिंदे,तर आभार पंढरी डाकोरे यांनी केले.
 या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यास नायगाव तालुक्यातील पनास च्या वर खेड्याचे सरपंच, चेरमन,तंटा मुक्ती अध्यक्ष व शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. मेळाव्याचे आयोजक तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्यासह तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे, कृषिरत्न हायटेक नर्सरी चे संचालक शितल पाटील, पंढरी पा. डाकोरे, मारोतराव कदम, अमोल सातेगावकर, केरबा रावते, माधव बेंद्रीकर, राजेश ढगे, केशव पा.सुगावे, बालाजी मातावाड, हाळदेवाड, दंडेवाड शिवाजी ढगे यासह घुंगराळा ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या