घाबरु नका, शेतकर्यांची दिवाळी गोड करू – पंकजाताई मुंडे
– (Riyaj Pathan)
आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे पालवे यांनी लोहा तालुक्यातील कारेगाव,पारडी येथील नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करतेवेळी अश्रू अनावर झालेल्या पांडुरंग पा.पवार,सुनंदा पवार, मारोती पा.डिकळे शेतकऱ्यांना यांना तुमच्या पाठीशी मी आहे,घाबरु नका, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, काळजी करू नका सरकारकडून घेऊन देऊत” असे अश्रूंचा बांध फुटलेल्या शेतकऱ्यांना आश्वासित केले.
“उभा पीक गेल्याने शेतकऱ्यांना फार मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे, शेतकऱ्यांना सरसकट झाली पाहिजे, मुंडे साहेबांची मला आयुष्यभर कमतरता भासणार आहे, आनेवारीत काही गडबड होत असेल तर त्या कागदांची होळी करू”पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देताना त्या म्हणाल्या. पत्रकार संजय कहाळेकर, शिवराज पवार,रियाज पठान, गोपाळ हिवंत आदीनी पंकजाताई यांची शेतकरी व सरकार विषयी प्रतिक्रिया घेतली.
नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्यात पंकजा मुंडे सोबत नायगाव चे आमदार राजेश पवार, बंजारा सेलचे देविदास राठोड, सोनखेडचे सुनील मोरे, पारडी येथील सरपंच राम पवार, उपसरपंच प्रतिनिधी शरद पवार,पॅनल प्रमुख माधव पा. पवार ,गोविंद पवार,बळीराम पवार, पोलीस पाटील विनायक मटके, कामाजी पवार, मारुती पवार,सुभाष डीकळे, शंकर डीकळे, काळेश्वर डीकळे सह कृषी, महसूल विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.
●■ भाजपा पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी ■●
————————————
लोहा तालुक्यात, भाजपा कार्यकर्त्यांचा सुकाळ असून सुद्धा पंकजा ताई च्या दौऱ्यात भाजपात पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची गैरहजेरी असल्याचे प्रामुख्याने दिसून आली.