पानसरे कनिष्ठ महाविद्यालयाची बारावीच्या निकालात उज्ज्वल यशाची परंपरा यंदाही कायम.

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         पानसरे कनिष्ठ महाविद्यालय अर्जापूर येथील यंदाच्या बारावीच्या निकालाची उत्कृष्ट व उज्वल यशाची परंपरा यंदाही तिन्ही शाखांनी कायम राखली आहे. दिनांक 25 रोजी राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल लागला असून यात अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी उत्तम प्रकारे यश संपादन केलेले आहे. यंदा कनिष्ठ महाविद्यालयाचा सरासरी निकाल 82.57% लागला आहे. विज्ञान शाखेचा सरासरी निकाल ९२.२२ टक्के लागला असून मिर्झा अब्दुल गफार बेग मिर्झा मुखीद बेग हा 600 पैकी 520 गुण घेऊन प्रथम आला असून त्याने 86. 67% गुण प्राप्त केले आहेत.कु.आयशा फारुखी ही 494 गुण घेऊन 82.33% गुण घेऊन यशस्वी झाली.
तर कु.आतिफा अमीम तृतीय क्रमांकाचे म्हणजेच 69.83% गुण घेऊन यशस्वी झाली.तर वाणिज्य शाखेचा सरासरी निकाल ९० टक्के लागला असून कु.अंकिता कोरडवार विद्यार्थ्यांमधून गुणानुक्रमे प्रथम आली असून तिने 486 गुण प्राप्त केले न तीने 81 टक्के गुण मिळविले आहेत.तर शेख रिजवान अहमद हा द्वितीय आला असून याने 80.83% गुण मिळविले आहेत तर कु. निकिता जाधव हिने ८०.३३ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच कला शाखेचा निकाल 73.88 टक्के लागला असून संदेश लाखे हा 85.17% गुण घेऊन प्रथम आला आहे.तर कु. शितल पेंटेवार हीने 72.83% गुण घेऊन द्वितीय आली असून कु. आरती गायकवाड ही 62.37% गुण घेऊन तृतीय क्रमांकाने यशस्वी झाली आहे.
         यशस्वी विद्यार्थ्यांचे हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहरराव देशपांडे, सचिव श्री सुनील बेजगमवार, उपाध्यक्ष श्री नागनाथराव पाटील श्री राजू शेठ उत्तरवार, शालेय समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप अंबेकर व सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक श्रीरामे,कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. नारायण गाडवे तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या