महसूल सप्ताहानिमित्त पानसरे महाविद्यालयात युवा संवाद कार्यक्रम संपन्न..

(बिलोली ता .प्र – सुनिल जेठे)
  पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथे दि. 2 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने वनविभाग व महसूल विभागाच्या वतीने आयोजित साजरा होत असलेल्या व1ते 7 ऑगष्ट दरम्यान संपन्न होत असलेल्या महसूल सप्ताहा निमित्त बिलोली तहसील कार्यालयाच्या वतीने युवा संवाद हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रमाणपत्राची आवश्यकता व ती कशी काढावीत याची माहिती करून दिली .यावेळी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी श्री सचिन गिरी,तहसीलदार श्री श्रीकांत निळे संस्थेचे प्रभारी अध्यक्ष श्री नागनाथराव पाटील सावळीकर संस्थेचे सचिव श्री सुनील बेजगमवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक श्रीरामे व सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री सचिन गिरी यांनी स्पर्धा परीक्षा व तिची तयारी, प्रवेश प्रक्रिया विविध प्रसंगी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात. याची सविस्तर माहिती करून दिली. तसेच तहसीलदार श्री श्रीकांत निळे यांनी आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे कधी व कसे काढावीत याविषयी मार्गदर्शन केले तसेच सदर कागदपत्रे कशी प्राप्त करावीत याची माहिती करून दिली. तसेच आता तुम्हाला तहसील कार्यालयात यायची आवश्यकता नाही तर आम्ही सर्व कागदपत्रे येथे विद्यार्थ्यांना एकाच वेळी आणून देऊत असे आश्वासन दिले. या प्रसंगी संस्थेचे प्रभारी अध्यक्ष श्री नागनाथराव पाटील सावळीकर, तसेच संस्थेचे सचिव श्री सुनील बेजगमवार यांनी विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांचे व प्रमाणपत्रांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक श्रीरामे यांनी प्रवेश प्रक्रिया व अपटूडेटपणा याचे महत्त्व सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात शिस्त आणि व्यवस्थितपणा व त्याचे उद्दिष्ट आणि वेेळेेचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नायब तहसीलदार श्री आर.जी चव्हाण, तलाठी व इतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.गोपाळ चौधरी यांनी केले तर आभार कु. जयमाला आडगे हिने व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या