राज्य अन्न आयोग अध्यक्षांनी घेतली पारडी शाळेची सदिच्छा भेट !

[ विशेष प्रतिनिधि – रियाज पठान ]
लोहा तालुक्यातील पारडी येथील जि.प.शाळेला राज्य अन्न आयोग,महाराष्ट्र राज्य मुंबई,अध्यक्ष महेश सुर्यकांत ढवळे यांनी धावती भेट दिली. अल्पावधीतच शैक्षणिक गुणवत्ता, कला, क्रिडा क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी, आदीसह नावारूपाला आलेल्या पिआरसीने प्रशंसा केलेल्या पारडी शाळेची माहिती घेऊन भारावून जावून आनंद व्यक्त केला.
शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच शालेय पोषण आहारासंदर्भात विद्यार्थ्यांना संवाद साधत चौकशी करून आनंद व्यक्त केला.
शालेय अभिलेखे,रंगरंगोटी पाहून,निसर्ग सौंदर्याने नटलेला शालेय परिसर पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी शाळेचे मु.अ. एम.एल.किसवे, प्रा.पदवीधर डि.पी.बालाघाटे, देशमुख, कदम मॅडम, गंगाखेडकर मॅडम, इंगोले मॅडम ,लामदाडे मॅडम ,शा.व्य. अध्यक्ष विठ्ठल डिकळे,व्यंकट डिकळे ,शरद पवार, बळीराम पवार, शिक्षणतज्ञ सचिन गायकवाड ,शिवराज पवार सह अंगणवाडी सेविका, मदतनीस सह सर्व शिक्षकवृंद यांचे अभिनंदन केले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या