पारडी जि.प.शाळेतील विद्यार्थिनींनी घेतली चक्क जि.प.च्या सीईओ वर्षा ठाकूर मॅडमची मुलाखत !

————————————————–
ध्येयनिष्ठा, सकारात्मकता आणि कठोर परिश्रम ही यशाची त्रिसूत्री अंगिकारावी-वर्षा ठाकूर
———————————————
शिक्षकांचे काम नावाड्यासारखे, सकारात्मक ऊर्जेला ते पैलू पाडून ते मुलं घडवतात-जि.प. सी.ई.ओ. वर्षा ठाकूर
—————————————————
(विशेष प्रतिनिधी/ रियाज पठान)

जि.प.नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दि.१८ फेब्रुवारीला लोहा तालुक्यातील दौऱ्यात त्यांनी जि.प.प्रा.शाळा पारडी येथे अचानक भेट देऊन शाळेतील भौतिक सुविधा,शाळेची प्रगती,नाविन्यपूर्ण उपक्रमांची बारकाईने पाहणी केली.

विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधला पारडी “शाळेतील विद्यार्थिनींनी तर चक्क नांदेड जि.प.च्या सी इ ओ मॅडमची मुलाखत घेतली”या वेळी विचारलेल्या सर्व प्रश्नांना हसत खेळत मुक्त उत्तरे दिली. स्वतःला कमी समजायचे नाही, ध्येय उच्च ठेवायचे, अभ्यास भरपूर करायचा आणि मोठ्या पदावर जायचे असा संदेशच विद्यार्थ्यांना दिला.

मुलींशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांच्या विद्यार्थी दशेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.यातून “ध्येयनिष्ठा, सकारात्मकता आणि कठोर परिश्रम ही यशाची त्रिसूत्री प्रत्येकाने अंगिकारावी”, असा संदेश त्यांनी दिला.शाळेतील सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून, सर्वांशी हसत खेळत मुक्त संवाद साधून समाधान व्यक्त केले.

त्यावेळी त्या पुढे बोलतांना म्हणाल्या कि, पारडी येथील सर्व शिक्षकांनी चांगला पायंडा पाडला असून शाळेच्या आकर्षक बोलक्या भिंती,बोलकी लोकं,बोलके पक्षी असून अतिशय सुंदर वातावरणात शाळा असून शाळेतील मुलांच्या चेह-यावर एनर्जी असून शाळेतील मुलं उच्च शिखरावर जाण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.”शिक्षकांचे काम नावाड्यासारखे असते, सकारात्मक ऊर्जेला ते पैलू पाडतात,त्यातून मुलं घडतात.विद्यार्थांना घडवण्याचा खुप मोठा रोल शिक्षकांचा असतो”.सद्य:स्थितीला युटयुब,गुगल,नेटचा वापर करण्याचाही सल्ला दिला.
शाळेतील बगीचा,शाळेतील बोलक्या भिंती,शालेय स्वच्छता, स्वच्छतागृह, वर्गखोल्या, चित्रसंदेश, अभ्यासपूर्ण लेखन, कार्यालयातील स्वच्छता, कार्यालयातील फाइल्स ची ठेवण,लोकसहभाग, जलपुनर्भरण, डिजिटल तंत्रज्ञानचा वापर, साहित्यपेट्या, सौर यंत्रणा, विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या खेळातील नैपुण्य, धुरमुक्त, तंबाखू मुक्त शाळा, स्वसंरक्षण प्रशिक्षण, निसर्ग सहल, इत्यादी बाबी व उपक्रम पाहून कार्यतत्पर गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के, शाळेवर चाणाक्षपणे लक्ष ठेवणारे जेष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी सर्जेराव टेकाळे,नाविण्यपुर्ण उपक्रमशिल मुख्याध्यापक श्री किसवे एम.एल., शिक्षक, विद्यार्थी,ग्रामस्थ, समिती,पेंटर पांचाळ यांचेही यांचे कौतुक केले.

यावेळी भेटी प्रसंगी लोहा पंचायत समिती विद्यमान सभापती श्री आनंदराव शिंदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुर्यकांत गायकवाड,गटविकास अधिकारी श्री जोंधळे साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री रवींद्र सोनटक्के, जेष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी श्री सर्जेराव टेकाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल पा. डीकळे, सरपंच राम पवार, होते.उपसरपंच श्री शरद पा.पवार, ग्रामसेवक ढगे,सदस्य व्यंकट पा.डीकळे, मुख्याध्यापक श्री.किसवे एम.एल., सहशिक्षक श्री.बालाघाटे डि.पी, सहशिक्षिका सौ.कदम जे.ए., सौ.गंगाखेडकर, सौ.कदम आर.जी., सहशिक्षक श्री देशमुख,बळीराम पवार, त्र्यंबक पवार,शंकर डिकळे,शाळेतील सर्व शिक्षक – शिक्षिका, विद्यार्थी, ग्रामस्थ, अंगणवाडी कर्मचारी सर्व जण शासनाने घालून दिलेल्या covid-19 च्या कोरोनाच्या नियमांचे पालन करून उपस्थित होते.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील डिकळे यांनी परिश्रम घेतले.

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षक श्री बालाघाटे डि.पी.यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री किसवे एम.एल.यांनी केले.

ताज्या बातम्या