कुंटूर येथे आज दि:- ३ ऑक्टोंबर २०२२ रोजी पालक मेळाव्याचे व शालेय व्यवस्थापन समिती निवड प्रक्रिया कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या सभागृहात सर्व पालकांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. सदरील पालक मेळाव्याचे व निवड प्रक्रिया कार्यक्रमाचे अध्यक्ष नायगाव मतदार संघाचे भावी नेतृत्व मा. राजेश कुंटूरकर साहेब प्रमुख अतिथी सेवा सहकारी सोसायटी कुंटूर चेअरमन मा. रूपेश कुंटूरकर, मारोतराव पा कदम कुंटूरकर, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मोहनराव होळकर, माजी ग्राम पंचायत सदस्य रज्जाक गुज्जिवाले, गणेश महाराज, हे याच्या उपस्थित खेळीमेळीच्या वातावरणात शालेय शिक्षण समितीची नीवड, करण्यात आली आहे.
पुढील वाटचालीस.जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर या शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज विविध ठिकाणी पोलीस, शिक्षक, डॉक्टर, बँक, उद्योजक व व्यवसाय या विविध ठिकाणी कार्यरत असून, जिल्हा परिषद पटसंख्या 965 झाली नांदेड जिल्हा मधील एकमेव पहिल्या क्रमांकावर शाळा ठरली आहे या परीसरातील सालेगाव, चारवाडी, परडवाडी, कोकलेगाव, हुस्सा, सांगवि डोंगरगाव, इकळीमाळ,कुंटूर, अशा अनेक गावांचा समावेश आहे. या परिसरातिल नावलौकिक अभ्यासक व शिक्षण एकमेव जिल्हा परिषद हायस्कूल मधे मीळत आहे म्हनून नावलौकिक होत आहे.
वरील उपस्थितीत अगदी पारदर्शक पद्धतीने शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी सौ. गिताताई विनायक बकवाड, व उपाध्यक्षपदी, मा. पंडीत पा. आडकिने, यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर समितीच्या सदस्य पदी भगवान मोहनराव कदम, चंद्रकात फुलारी, शिवाजी पा. कदम, बालाजी हणमंते,पत्रकार पवनकुमार पुट्टेवाड,पत्रकार कोमाराजी तोलबा महादाळे, सौ.अनुसया विजय झुंजारे, सौ अनुराधा दत्ता शिंगणे, रुक्साना बाबू तांबोळी, यांची निवड झाली आहे.
आणि ग्राम पंचायत प्रतिनीधी म्हणून उपसरपंच मा. शिवाजीराव पा. होळकर , शिक्षण प्रेमी म्हणून, यशवंत रामदासी, मोहनराव होळकर, शिक्षक प्रतिनिधी, गीता व्यकंटराव नित्तेवाड वरील प्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पालक, गावातील नागरिक, महिला, मुख्याध्यापक राजपूत सर, व जिल्हा परिषद शाळेचा सर्व स्टॉप पत्रकार बालाजी हणमंते, पवनकुमार पुट्टेवाड, अनिल कांबळे उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy