नायगाव मतदारसंघातील मतदार पुन्हा कमळाच्या पाठीशी राहून प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवडून देणार ; खासदार अशोकराव चव्हाण यांचे मत !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
मतदारसंघातील मतदारांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या मोदीच्या कमळावर विश्वास ठेवून प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडून देण्याचे काम केले मतदार तोच मतदार आता वसंतराव चव्हाण यांचे ऐकणार नाहीत पुन्हा भाजपाच्या मोदीच्या विचाराच्या कमळावर मतदान करून प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठ्या संख्येने निवडून आणतील असा विश्वास मला आहे असे मत खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपले मत नरसी येथील भाजपाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या प्रमुख ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटी सदस्य मेळावा व्यक्त केल.

ते नरसी येथे बौद्धप्रमुख ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटी मेळावा बैठकीचे आयोजन श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, शिवराज पाटील होटाळकर, राजेश कुंटूरकर यांनी आयोजित केले होते प्रास्ताविक श्रावण पाटील भिलवंडे यांनी केले तर या कार्यक्रमात बालाजी बच्चेवार, शिवराज पाटील होटाळकर , भास्करराव पाटील खतगावकर प्रतापराव पाटील चिखलीकर,यांनी आपले मत व्यक्त केल , खासदार अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले की जनतेचा मोदीवर आहे कारण मोदीजींचे नेतृत्वावर आहे मोदीजींनी दिल्लीमध्ये जी 2020 ठेवून जगातील देशासह देशाबाहेरील प्रमुखांना बोलावून एकत्र आणून मोदींनी जगाचा विश्वास संपादन केला त्यांच्या नेतृत्वाखाली चंद्रावर चंद्रयान पाठवून, धाडस दाखवण्याचे काम केवळ देशात मोदींनीच केले देशात रेल्वे सेवा,विमान सेवा, देशात गडकरी यांच्या नेतृत्वाखाली दळणवळणासाठी समृद्धी महामार्ग रस्ते अंतर्गत ग्रामीण भागात शहराचा मोठा विकास केला मोदींनी विकसित देशात भारत नंबर एक वर नेऊन ठेवला आहे मोदींच्या कामावर क्षमता व धाडस विकसिल भारताकडे नेऊन ठेवण्याचा स्वप्न मोदीजीनी करून दाखविला आता सुद्धा मतदार आपकी मोदी सरकार चारशे पार भाजप महायुतीचे सरकार करून दाखवेल यात शंका नाही नांदेड जिल्ह्यात आमच्या भाजपाच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र येऊन खासदार अशोक चव्हाण ,प्रताप पाटील चिखलीकर ,हेमंत पाटील, डॉक्टर अजित गोपखेडे,शृंगारे पाच खासदार जिल्ह्याचे नेतृत्व करत यापुढे मोठ्या प्रमाणात विकास करण्याचे ध्येय ठेवला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या  नेतृत्वाखाली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या या मेळाव्याला उदघाटक म्हणून माजी मुख्यमंञी तथा राज्यसभेचे खा.अशोकराव चव्हाण. प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी राज्यमंञी भास्करराव पा. खतगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी, माजी आमदार अविनाश घाटे, देविदास राठोड, प्रवीण साले उमाकांत गोपचेडे, मारोतराव वाडेकर मीनाक्षी कागडे, गजानन श्रीमानवार, मनोहर पवार, बालाजी मदेवाड, बाबुराव अडकिने अशोक पाटील मुगावकर, धनराज शिरोळे दत्ता पाटील पवार, अंबादासराव धर्माधिकारी गंगाधर बडूरे, प्रमुख कार्यकर्ते नायगाव मतदार संघातील  बूथ प्रमुख , ग्राम पंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी सदस्य, महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते आदींनी या  मेळाव्यास मोठ्या संख्येत उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या