जनतेच्या पाठबळावर नांदेड लोकसभा निवडणूक लढविणार : वसंतराव चव्हाण

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठोंनी पार्लमेन्ट्री बोडांकडे माझ्या एकमेव नावाची शिफारस केली असल्यामुळे मी पक्षश्रेष्ठींचा आभारी आहे. जनतेच्या पाठबळावर लोकसभा निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे मत माजी आमदार तथा नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
देशात व राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पक्षाचे प्रांत अध्यक्ष नाना पटोले यांनी या मतदारसंघात उमेदवार म्हणून वसंतराव चव्हाण यांचे एकमेव नाव पक्षश्रेष्ठींना कळविले असल्याने वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचे सांगीतले जात आहे.
त्यांच्या नावाला वरिष्ठ पातळीवरून शिक्कामोर्तब करण्यात आल्याने व तसा संदेश पक्षाच्या जवाबदार नेते व कार्यकत्यांना आला असल्याने ते व त्यांचे समर्थक युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. लोकसभेची उमेदवारी फायनल झाल्याचा संदेश मिळाल्यानंतर शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेऊन आलेले वसंतराव चव्हाण यांचे नायगाव नगरीत आगमन होताच नायगाव, धर्माबाद, उमरी, देगलूर येथील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख शिलेदारांनी जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन त्यांना उमेदवारीबाबत शुभेच्छा दिल्या.
लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष अर्थात भाजपचा उमेदवार कोण? हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नसून, सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर नांदेड लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा झेंडा रोवण्यासाठी कार्यकर्त्या एवढेच मतदारही इच्छुक आहेत. आगामी काळात होत असलेल्या या निवडणुकीत अनेक प्रश्न जनतेच्या अडचणी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याने वैतागलेली जनता परिवर्तनाच्या दिशेने मतदान करणार असून, नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार हा धनशक्ती नाही तर जनशक्तीच्या बळावर विजयी होणार, असा विश्वास माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या