लोहयात एमडी ची पदवी नसणाऱ्या पॅथालाजी लॅबवाल्याची डॉक्टरांच्या मिलीभगतमुळे रुग्णाची प्रचंड प्रमाणात लुट !

जिल्ह्यधिकाऱ्यांनी तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याची जनतेतून मागणी !
[ विशेष प्रतिनिधी – रियाज पठान ]
लोहा शहरात एमडी पॅथालाजीची पदवी नसणाऱ्या पॅथालाजी लॅबवाल्याची डॉक्टरांच्या मिलीभगतमुळे रुग्णाची प्रचंड प्रमाणात लुट होत असुन याकडे शासकीय यंत्रणेने हप्ते घेऊन, मुग गिळून गप्प बसले असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली असून याकडे जिल्ह्यधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने संपूर्ण राज्यासह लोहा तालुक्यात सर्दी,पडसे,ताप मलेरिया,डेंग्यू व्हायरल इन्फेक्शन, पेशा कमी होणे आदी आजारांची साथ पसरली आहे.यामुळे खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांची व खाजगी पॅथालाजी लॅबवाल्याची पोळी पिकली असुन दोघांच्या संगनमताने रुग्णांना अवाच्या सव्वा फी आकारून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे.
याबाबत एकाने शासकीय यंत्रणेकडे म्हणजे लोहा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे, लोहा तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे व लोहा तहसिलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.परंतू म्हणतात ना गेंड्याची कातडी पांघरलेल्या,झोपेचे सोंग घेतलेल्या शासकीय यंत्रणेला म्हणजेच लोहा तालुक्यातील प्रशासनाला जाग येत नाही.
स्थानिक प्रशासन आपले हात ओले करून मुग गिळून गप्प बसले आहे.या अनाधिकृत लॅब वाल्यांना रुग्णांना लुटण्यासाठी रान मोकळे सोडले आहे.लोहा शहरात शिवकल्याण नगर सहीत अनेक ठिकाणी एमडी पॅथालाजी पदवी नसलेल्या लॅब वाल्यांनी मोठ्या प्रमाणात दुकानदारी थाटली आहे. खाजगी रुग्णालयात या लॅब वाल्यांचे माणसं रक्त तपासणी करण्यासाठी खाजगी डॉक्टरांच्या सांगण्यानुसार दवाखान्यात येत आहेत.
रुग्णांचे रक्त तपासणीला नेऊन हजारों रुपयांची लूट करीत आहेत.लॅबवाले हे डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात कमिशन देत असल्याचे चर्चा जनतेतून होत आहे.काही वेळा गरज नसताना सुद्धा खाजगी डॉक्टर हे कमिशनच्या हव्यापोठी लॅबवाल्याचा फायदा करण्यासाठी रक्त तपासणीसाठी लॅब वाल्यांना खाजगी रुग्णालयात बोलावत आहेत आपल्या सोयीनुसार रिपोर्ट देत असल्याची चर्चा जनतेतून होत आहे.
काही वर्षांपूर्वी जिल्ह्यधिकारी नांदेड यांनी या अवैध पॅथ वाल्याच्या विरोधात,बोगस डॉक्टरांच्या विरोधात, अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या रुग्णालयाच्या विरोधात जोरदार मोहीम राबवून अनेकांना सील ठोकून गुन्हे दाखल करुन दंडात्मक कारवाई केली होती.
त्याच प्रमाणे जर आजघडीला जिल्ह्यधिकाऱ्यांनी एमडी पॅथालाजी पदवी नसलेल्या राजरोसपणे अवैधरित्या लॅब चालविणाऱ्या लॅब धारकावर कठोर कारवाई करावी त्यात कित्येक मासे गळाला लागतील,यात दुमत नसल्याचे बोलल्या जात आहे.तसेच आयकर विभागाने रुग्णांना लुटणाऱ्या लाखो – करोडो कमविणाऱ्या पण शासनाचा टॅक्स न भरणाऱ्या डॉक्टरांबरोबरच अवैधरित्या एमडी पॅथालाजी पदवी नसलेल्या लाॅबवाल्यानी जमविलेल्या मालमत्तेची ही चौकशी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या