पथसंंचलन स्पर्धेचे पारितोषिक वितरण !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त के रामलू नाबाद नगराध्यक्ष सामाजिक ग्रुप तर्फे पथसंचलन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यात सर्वप्रथम कै. गंगाबाई पोत्तना सब्बनवार माध्यमिक शाळा ‘विविधतेत एकता’ या विषयाचे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक ‘महिला सशक्तीकरण काळाची गरज’ या विषयावर सादरीकरण करून के रामलू इंग्लिश मीडियम स्कूल ने पटकावले तर तृतीय क्रमांक ‘ सोशल मीडिया आणि आजची तरुणाई’ या विषयावर सरस्वती टेक्नो स्कूल यांनी पटकावला.
उत्तेजनार्थं प्रथम शाहू महाराज प्राथमिक शाळा यांनी पटकावला उतेजनार्थ द्वितीय क्रमांक जि.प. केंद्रीय कन्या शाळा कुंडलवाडी यांनी पटकावला सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते सय्याराम मुकेरवार यांनी केले.
यात देशभक्तीपर गीत करण समेटवार व दत्तू हमंद यांनी गायले तर स्पर्धेचे उत्कृष्ट परीक्षण डॉ.बोधनकर नरेश यांनी केले कार्यक्रमासाठी यशस्वी होण्यासाठी साई भोकरे, प्रशांत पांडे,रफत खान, सिंनु चव्हाण, अनिल पेंटावार, साई येपुरवार, विजय गुप्ता, लक्ष्मीकांत येपुरवार,दत्तू भोरे , व्यंकुअण्णा सब्बनवार, शिवाजी तानुरे आदी ने परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्तू हमंद यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या