गंगामणी वाळवंटे सरपंच,तर स्वर्णाबाई वानखेडे उपसरपंच पदी बिनविरोध निवड!

(धर्माबाद प्रतिनिधी-नारायण सोनटक्के)

तालुक्यातील पाटोदा ( बु ) येथे ग्रामपंचायत मध्ये सरपंच व उपसरपंच पदाची निवड घेण्यात आली.सरपंच गंगामणी लक्ष्मण वाळवंटे तर उपसरपंच स्वर्णाबाई लोकडोबा वानखेडे याची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैभव सोनटक्के,नागोराव जारीकोटे, धुरपतबाई जगदंबे, लोकडोबा पिल्ले,गोदावरी कुदळे हे उपस्थित होते.

बिनविरोध निवडणूक काढण्यासाठी गावातील माजी सरपंच लोकडोबा पा.वानखेडे, दिगाबंर पा.साळूके, अशोक पा.वडजे, लोकडोबा पा. कुदळे, शिवराज पा.जारीकोटे, शिवशंकर पा.मोताचे, गोविंद पा.मेळगावे, अशोक सोनटक्के राजु बामणे, बालजी आलकंवार, विलास डाकोरे, लोकडोबा धारजने, चंपतराव वानखेडे, शेषेराव पा. वानखेडे,व गावकऱ्यांनी मदत केली.

यावेळी अधिकारी ए.आर.खान.कनिष्ट प्रशासन अधिकारी पंचायत समिती धर्माबाद व ग्रामसेवक व्ही.पी.रामोड यांची उपस्थिती होती. यावेळी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांना यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

ताज्या बातम्या