पाटोदा ता.नायगाव येथे शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी व गुरूगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
जि.प प्राथमीक शाळा पाटोदा तालुका नायगाव शाळेत,शाळेतील शिष्यवृत्ती पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बरबडा केंद्रातील गुरुगौरव प्राप्त शिक्षकांचा सत्कार सोहळा शाळेत घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नायगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय अशोक पवळे सर, कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी महोदया सौ.सविता बिरगे मॅडम आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री व्यंकट अनेराये सर होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिवकिर्तनकार श्री चंद्रकांत आमलापुरे सर यांनी केले विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीमध्ये अतिशय देखना सत्कार सोहळा घेण्यात आला. 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या