प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पवन आडवळे सर यांचा सन्मान !

कोषाध्यक्ष पदी श्री अवधूत पवार यांची निवड ।
[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी प्रा. अंगद कांबळे ]
 १ सप्टेंबर २०२१ रोजी प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट) म्हसळा संघटनेतर्फे मा.शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री नरेशजी सावंत सर यांच्या अध्यक्षतेखाली कोण होणार करोडपती या कार्यक्रमात सहभागी झालेले कणघर शाळेचे प्राथमिक शिक्षक श्री पवन आडवळे सर यांचा सन्मान शाळ व पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अरविंद मोरे, तालुका अध्यक्ष नरेश सावंत,सचिव अण्णासाहेब बिचुकले, नवनिर्वाचित कोषाध्यक्ष अवधूत पवार , कौचाली जनाब, प्रशांत मोरे, महादेव पवार, सत्कार मुर्ती पवन आडवले सर, किरण पाटील, बशिर उल्डे, काळूराम राठोड,गावीत मॅडम, बागवान मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
कोण होणार करोडपती या कार्यक्रमात १२,५०,०००/- विजेते झालेले श्री.पवन आडवळे सर यांच्या कार्याबद्दल बशिर उल्डे सर, प्रशांत मोरे, अरविंद मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

पवन आडवळे सर यांनी मल्लखांब या खेळाविषयी माहिती दिली. तळागाळातून ते राज्य स्तरावर दाखवलेल्या कौशल्य बद्दल विशेष उल्लेख केला. कोण होणार करोडपती स्पर्धे बाबत अभ्यासात्मक विचार मांडले.
अध्यक्षीय मनोगतात सावंत सर यांनी आडवळे सर यांनी स्वता: च्या नावासह म्हसळा तालुक्याचा नाव रोशन केले. सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. याविषयी विशेष उल्लेख केला .
तसेच, संघटनेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या कोषाध्यक्ष पदी श्री अवधूत पवार सर यांची नियुक्ती करण्यात आली व‌ त्यांना नियुक्त पत्र देण्यात आले.
या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिचुकले सर यांनी केले व आभार जलकोटे सर यांनी मानले. कार्यक्रमा प्रसंगी ५० ते ६० सभासद आवर्जून उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या