बिलोलीत श्रीराम नवमी व रमजान ईद निमित्त शांतता समिती बैठक संपन्न !

श्रीराम नवमी, रमजान ईद च्या कालावधीत पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष द्या – उपविभागीय पोलिस अधिकारी मा.विक्रांत गायकवाड.

( बिलोली ता प्र.सुनिल जेठे )
बिलोली पंचायत समिती सभागृह येथे बिलोली पोलिस ठाणे च्या वतीने श्री.राम नवमी व रमजान ईद निमित्त शांतता समिती ची बैठक दि.१७ मार्च रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या आध्यक्षतेखाली घेण्यात आली.

सदरिल या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा.तहसिलदार मा.श्रीकांत निळे, बिलोली न.प.चे मुख्यधिकारी प्रशांत ठोंबरे, बिलोली पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक मा.आनंत नरूटे, हे उपस्थित होते.
या शांतता समिती बैठक कार्यक्रमात धर्माबाद- बिलोली उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड आपल्या भाषनात बोलतांना म्हणाले की, कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये व कोणताही गुन्हा दाखल होणार नाही याची खबरदारी व जबाबदारी पालकांनी घ्यायची आहे.
आपले पाल्य कोठे चालले? काय करतात? फोन वापरताना कोणतेही चुकीचे मॕसेज टाकू नये याकडे लक्ष द्यायचे आहे. जर-तर कोणताही प्रकार घडल्यास त्या वेळी त्या व्यक्तीची गय केली जाणार नाही. असे आवाहन त्यांनी केले.
तर तहसिलदार श्रीकांत निळे बोलतांना उपअभियंता अधिकारी यांना रमजान ईद व श्री रामनवमी कालावधीत विज खंडित होऊ नये व पालिकेचे मुख्यधिकारी प्रशात ठोंबरे यांनी शहरात स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे अशी सुचना दिली.
यावेळी पत्रकार गफुर कुरेशी, भिमराव बडूरकर, शेख फारुख, शेख सुलेमान, संजयकूमार पोवाडे, सय्यद रियाज, शेख ईलियास, सुनिल जेठे, नबाजी कुडकेकर, मुकिंदर कुडके, हिंदु, मुस्लीम बांधवात मौलाना खान, सैफ पटेल, सय्यद फिरदोस, मझर कुरेशी उपस्थित होते. या कार्यक्रमात सुञसंचलन प्रा.गोपाळ चौधरी यांनी केले होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या