दि.8 सप्टेंबर 2021 रोजी नगरपालिकेच्या सभागृहात शांतता समितीची बैठक धर्माबादचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड व सहायक पोलीस उपनिरीक्षक करीमखान पठाण, पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या बैठकीत येणा-या गणेशोत्सव, दुर्गा उत्सवानिमीत्त कोव्हीड 19 चे शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करून परवाना धारक गणेश मंडळांनी 4 फुट उंचीची गणेश मुर्ती तर घरगुती गणेश मंडळांनी 2 फुट उंचीची मुर्ती बसवावी, तसेत सांस्कृतीक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयी कार्यक्रम साध्यापध्दतीने साजरी करण्याचे आवाहन विक्रांत गायकवाड यांनी सर्व गणेश व दुर्गा मंडळांना केले.
यावेळी नगराध्यक्षा प्रतिनिधी नरेंद्र जिठावार, उपाध्यक्ष शैलेश -याकावार, यांच्यासह नगरसेवक, शहरातील प्रतिष्ठीत व्य़ापारी, नागरीक सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, विजवितरणचे प्रतिनिधी, पत्रकार, गाव व परीसरातील गणेश व दुर्गा मंडळाचे पदाधिकारी उपस्थीत होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन अनमुलवार, शंकर चव्हाण, नागेंद्र कांबळे, दिलीप जाधव, संजय चापलवार, तैनात बेग इंद्रीस बेग, महेश माकुरवार, कमलाकर, गंधकवाड, भालेराव, शेख अलिमोद्दीन आदींनी परीश्रम घेतले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy