राम नवमी निमित्त कुंडलवाडीत शांतता समितीची बैठक संपन्न !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील शहरात दिनांक 30 मार्च रोजी राम जन्मोत्सवानिमित्त शहरात भव्य अशी शोभायात्रा व मिरवणूक निघणार आहे,या अनुषंगाने कुंडलवाडी पोलीस ठाणे येथे शांतता समितीची बैठक दिनांक 25 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाली आहे.

या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांनी सर्व राम भक्तांनी नियमाचे पालन करत शहरात कायदा सुव्यवस्था आबादीत ठेऊन शांततेत राम जन्मोत्सव साजरा करावा असे उपस्थित राम भक्तांना आवाहन केले आहे.

या बैठकीला माजी उपाध्यक्ष डॉ विठ्ठल कुडमुलवार,सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन संतोष शिवशेट्टे, माजी नगरसेवक दत्तूसेठ ऱ्याकावार, गंगाप्रसाद गंगोने, राम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी मुकेश जोशी, राजू माहेवार, सोनू सब्बनवार,साईनाथ माहेवार, विकास अर्जुने, शेखर खांडरे, महेश कापकर, सुरेश राजटवार, पवन मंदीकुंटावार, योगेश गडपवार, मारोती गडपवार, विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी व्ही एन गुंडले, डी एन देवनपल्ले, डी डी पवार, नगरपालिका कर्मचारी धोंडीबा वाघमारे, पत्रकार गणेश कत्रूवार, अमरनाथ कांबळे, मोहम्मद अफजल, सिद्धार्थ कांबळे, नागोराव लोलापोड, दिगंबर लाडे, हर्ष कुंडलवाडीकर, पोलीस शिपाई इंद्रिस बेग आदिसह मोठ्या प्रमाणात राम भक्त उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या