नांदेड जिल्हा पेंशनर्स असोशिएसनची 24 ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभा

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
नांदेड जिल्हा सेवा निवृत्त कर्मचारी, अधिकारी जेष्ठ नागरिक असोशिएसनची सर्व साधारण सभा दि. 24 ऑगस्ट रोजी हनुमान मंदिर सभागृह विजय नगर नांदेड येथे सकाळी 10 वाजता आयोजित केले आहे.
            या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, मुख्य लेखा वित्त अधिकारी शिवप्रकाश तन्ना,उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कामावर, जिल्हा कोषागार अधिकारी जोती बगाटे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अभय चौधरी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सविता बिरगे, अप्पर कोषागार अधिकारी समरकुमार पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी नांदेड जिल्ह्यातील पेन्शनर्स असोशिएसनचे सर्व सभासद उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष इंजी.द.मा.रेड्डी, उपाध्यक्ष मिरा खॉन, सचिव चंद्रकांत जेटाळ, कोषाध्यक्ष सू.ग. चौधरी, सहसचिव एन.जी.कोकाटे, सदस्य संभाजी शिंदे, सुभाष कुरुडे, जनार्दन मुंड, सरदार परणसिंघ आदींनी केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या