घरकुल योजनेतील बांधकाम परवानगी घेतली नसलेल्या लाभार्थ्यांनी २ फेब्रुवारी पर्यंत बांधकाम परवानगी घ्यावी – मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे

[ कुंडलवाडी- अमरनाथ कांबळे ]
     प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरातील नागरिकांना घरकुल मंजूर झाले आहेत. पण अद्याप बांधकाम परवानगी घेतली नसलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष अभियाना अंतर्गत नगरपरिषद कार्यालय येथे ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत बांधकाम परवानगी मेळावा आयोजित केला असून बांधकाम परवानगी लागणारी आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्यांनी जमा करून २ फेब्रुवारी पर्यंत बांधकाम परवानगी घ्यावी व कामास सुरुवात करावी. असे आवाहन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी करीत २ फेब्रुवारी पर्यंत बांधकाम परवानगी घेतली नसल्यास घरकुलाच्या यादीतून लाभार्थ्याचे नाव कमी करण्यात येणार असल्याची माहिती ही मुख्याधिकारी ठोंबरे यांनी दिली आहे.
 कुंडलवाडी शहरात प्रथम टप्प्यात १३०४ घरकुल मंजूर करण्यात आले होते.यातील ६२० घरकुलाचे काम पूर्ण झाले असून ६८४ घरकुलाचे बांधकाम अद्यापही पूर्ण झाले नाही.तसेच दुसऱ्या टप्प्यातील १९७ मंजूर घरकुलांपैकी १६० घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून ३७ घरकुलांचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही.यासाठी प्रशासनाकडून घरकुल बांधकाम परवानगी साठी २ फेब्रुवारी पर्यंत विशेष मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात ज्या घरकुल लाभार्थ्यांनी अद्याप बांधकाम परवानगी घेतली नसल्यास बांधकाम परवानगी घेऊन कामास सुरूवात करावे असे आवाहन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या