कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन गुरुवर्यांच्या हस्ते संपन्न !!

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव उप बाजारपेठ मांजरम येथे सण 2021 मध्ये बाजार समितीचे तत्कालीन सभापती माननीय मा. आ. श्री वसंतराव चव्हाण यांच्या अथक परिश्रमातून मांजरम येथील डिझेल व पेट्रोल पंप हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सोलापूर यांच्याकडून मंजूर करून घेऊन अवघ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये पेट्रोल पंप उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व शासकीय परवाना व बांधकाम पूर्ण करून पंचक्रोशीतील कोलंबी येथील मठाधिपती गुरुवर्य श्री यदुबन महाराज कोलंबीकर यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला.
बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक श्री एस जी गन्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सचिव श्री एस व्ही कदम, हिंदुस्तान पेट्रोलियम चे जिल्हा व्यवस्थापक श्री शोबित सोनी साहेब व कर्मचारी एम एस कदम ,माधव कुलकर्णी ,रामदास गायकवाड ,काळेश्वर बोमनाळे, मारुती पन्नासे, शंकर पापडु, साईनाथ भालेराव, व भुजंग माऊलीकर इत्यादी यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला सदर नावीन्यपूर्ण उपक्रमांस नायगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री श्रीनिवास व्यंकटराव पाटील चव्हाण मांजरम चे सरपंच सौभाग्यवती शोभाबाई निळकंठ राव माली पाटील बाजार समितीचे माजी उपसभापती माननीय मोहनराव पाटील धुपेकर, माधवराव जी बेळगे ,हनुमंतराव पाटील चव्हाण ,माजी संचालक परसराम पाटील कांडाळकर, संजय रेड्डी ,भगवान पाटील लंगडापुरे ,सतीश सावकार लोकमनवार ,शेषराव दासवाड ,गणपतराव पाटील गायकवाड,व मांजरम व परिसरातील ग्रामस्त यांनी हजर राहून शुभेच्छा दिल्या आहेत.
व्यापारी श्री शंकर पाटील लाब्दे बालाजी सावकार कोटुरवार भगवान पाटील ताटे मुगावकर व मांजरम येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.तसेच मांजरम जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.पुनमताई राजेश पवार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या