अलिबाग तालुक्यातील पेझारी- नागोठणे रस्त्यावर श्रीगाव येथिल नदिवरील पुलालगत संरक्षक कठाडे बांधण्यासाठी देवव्रत पाटील यांची मागणी !

[ तालुका प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
अलिबाग तालुक्यातील पेझारी नागोठणे रस्त्याचे दुरूस्तीचे काम गेल्याच वर्षी करण्यात आले, परंतु हे काम करताना अनेक त्रृटी राहिल्या आहेत. त्यामुळे सदर ठिकाण हे “अपघात ठिकाण” म्हणून ओळखल्या जात आहेत.

 या ठिकाणांपैकी या मार्गावरील श्रीगाव नदीवर दुरूस्त केलेला कठाडा हा फक्त नदीच्या पात्रापुरताच आहे. कठाड्यापासुन कोणत्याही प्रकारची भरावकरून साईडपट्टी काढली नाही. व कठाड्यापासुन कमितकमी १५ फुटांपर्यंत संरक्षक कठाडे काढणे आवश्यक होते. परंतु ते कठाडे बाधले नसल्यामुळे एखादे वाहन चुकून बाजुला ऊभे करण्याठी नेले अथवा एखाद्या गाडीवरील नियंत्रण थोडे जरी चुकले तर ती गाडी थेट नदीपात्रात जाईल व मोठा अपघात होऊ शकतो. नदीपात्र हे रस्त्यापासुन जवळपास ४० फुट खोल असुन रस्त्याला या जागी मोठे वळण आहे .

या सर्व बाबींचा विचार करता येथे संरक्षण कठाडे तातडीने बाधण्याची मागणी मनसे शॅडो कॅबिनेट सदस्य श्री देवव्रत विष्णु पाटील यांनी या रस्त्याची जबाबदार अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग , पेण चे D M पाटील यांची भेट घेऊन केली. यावेळी D M पाटील यांनी मागणीला सकारात्मक प्रतीसाद देत कठाडे बांधण्याचे आश्वासन देवव्रत पाटील यांना दिले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या