दिव्यांग वृध्द निराधार उपाशी ! लोकप्रतिनिधी, प्रशासन तुपाशी !! – चंपतराव डाकोरे पा.कुंचेलीकर !

[ माहुर ]     दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली नादेड जिल्हयातील सर्व तहसिलदार साहेब यांच्या मार्फत मा.आयुक्त साहेब औरंगाबाद, दिव्यांग आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी साहेब नांदेड, मुख्यकार्यकारी जि.प. नांदेड यांना निवेदन देऊन व माहुर तहसिलदार साहेब, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ शेरकुरवार, ता.अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण यांच्या शिष्टमंडळ चर्चा करून निवेदनाद्वारे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र शासन प्रशासन जरी तुपाशी खात असतील पण जे दिनदुबळे दिव्यांग वृध्द निराधार यांना दर महा 1000 रू जगण्यासाठी दिले जाते त्यात दोन वेळा चहा साठी दुधाचे पाकिट सुध्दा येत नाही ते कसे जगत असतील याचा विचार सत्तेत बसलेल्या मंञ्यांना कळत नसेल काय?
आमदार यांना दरमहा लाखो वेतन मिळते अनेक भत्ते मिळतात प्रशासकीय कर्मचारी यांना लाखो रूपये पगार मिळताना ते पुरत नाही म्हणून ते संप करून पगार, महागाई भत्ता वाढवुन घेतात.
आणि ज्या गोरगरीब जनतेच्या मतावर सतेत जाताना दिनदुबळ्याच मीच कैवारी म्हणून मते मागतात ते लोकप्रतिनिधी दिनदुबळ्याचा विचार का करीत नाहीत?

शासन प्रशासनातील लोकांना वेळेवर मानधन,पगार मिळते. तर दिनदुबळ्यांना मिळणारे एक हजार रुपये तेही पाच महिने मिळत नाही व अनेक सवलतीसाठी दिव्यांग वृध्द निराधार यांना शासन प्रशासन जागे करण्यासाठी मोर्चा, धरने, आंदोलन करून न्याय मिळत नसल्याने दिव्यांग वृध्द, निराधार रस्त्यावर उतरतील यांची प्रशासनाने दखल घ्यावी असे या निवेदनात जि.उपाध्यक्ष राजु शेरकुरवार, ता.अध्यक्ष प्रेयसिग चव्हाण , अरविंद राठोड, दादाराव कांबळे, गणेश पवार, खराटे ईत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत असे प्रसिध्दी पञक ता.अध्यक्ष प्रेमसिग चव्हाण यानी दिले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या