नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचा शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी केला सत्कार !

[ नायगांव प्रतिनिधी ‍‍]
[ दि.५ सप्टेंबर नायगांव बाजार ]
नायगांव पोलीस स्टेशन येथे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले, उत्कृष्ट अनुभव असलेले श्री अभिषेक शिंदे साहेब यांनी पदभार स्वीकारला असता, सामाजिक कार्यकर्ते- शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी नवनिर्वाचित पोलीस अधिकारी श्री अभिषेक शिंदे‌ यांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला.
या छोटेखानी सत्कार समारंभ प्रसंगी, पोलीस स्टेशनचे पो.हे. कॉ. विलास मुस्तापुरे साहेब, सह पोलीस कर्मचारी, म.से.स संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष गौतम वाघमारे, प्रकाश वाघमारे, शंकर वडपत्रे, सह आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे साहेब यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले, व यावेळी शिंदे यांनी नायगांव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अवैध धंद्यांना अजिबात थारा दिला जाणार नाही, कुठल्याही परिस्थितीत अवैध धंद्यांना वाव मिळणार नाही, व अवैध धंदे दिसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असाही इशारा यावेळी या सत्कार समारंभाच्या वेळी देण्यात आला.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या