सोनू राजरवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या हस्ते वृक्षारोपन !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
सिंधी येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू राजरवाड यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र सिंधी येथे शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आले. यावेळी सिंधीचे सरपंच प्रभाकर पाटील पूयड, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंदराव पाटील सिंधिकर, उपसरपंच विलास पाटील नरवाडे, डॉ.हमद, संदेश गायकवाड, सेवक पिटलेवाड, पवळे सर, आदी जन उपस्थित होते.

शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी सोनू राजरवाड यांचे सामाजिक उपक्रम राबवल्या बद्दल अभिनंदन केले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या