नायगाव येथे माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
राज्याचे माजी अर्थ व कृषीमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने नायगाव येथील पानसरेनगरातील साईबाबा मंदिर येथे आरती व वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ व्यापारी चंद्रकांत कवटीकवार, नायगाव आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष सतीश मेडेवार, महासभेचे कार्यकारणी साईनाथ मेडेवार, महासभेचे जिल्हा प्रसिद्धप्रमुख गजानन चौधरी, जिल्हा कार्यकारणी सदस्य धनंजय कवटीकवार, सचिन चिद्रावार, रमेश मेडेवार, गणेश कोंडावार, कोषाध्यक्ष सूर्यकांत कवटीकवार, महेश पत्तेवार, पवन गादेवार, चंद्रकांत बच्चेवार, जगदीश प्रतापवार, मनोज आरगुलवार, नरेश गंदेवार, साईनाथ गादेवार, आदी सह समाज बांधव मोठ्या संख्येने होते. 

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या