अर्जापुर येथे पोलिसांच्या पुढाकाराने सामाजिक सलोखा कायम ; दोन्ही समाजातील तरुणांनी नामफलक काढून केले वृक्षारोपण !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
        येथून 3 किमी अंतरावर असलेल्या मौजे अर्जापुर येथील बसस्थानक येथे बजरंदलाचे नाम फलक,पंचशील ध्वज,व टिपू सुलतान यांचे फलक लावण्यात आले होते,या विविध रंगाच्या ध्वज व फलकामुळे गावात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी पुढाकार घेत दिनांक 13 रोजी ग्रामपंचायत येथे एक बैठक घेऊन दोन्ही समाजाच्या तरुणांच्या मनातील गैरसमज काढून गावातील नागरिक व पोलीस प्रशासनाने सदरील ध्वज काढून त्याठिकाणी वृक्षारोपण करत सामाजिक सलोखा जोपासला आहे.

              बिलोली तालुक्यातील आर्जपुर येथील बस्थानक परिसरात गत वर्षी अनधिकृत मुस्लिम तरुणांनी टिपू सुलतान जयंती निमित्त नामफलक लावले होते,त्यांनतर दलीत बांधवांच्या वतीने अनधिकृत पंचशील ध्वजाचा झेंडा लावण्यात आले,हे पाहून बजरंग दलाच्या तरुण कार्यकर्त्यांनी अनधिकृत नामफलक व ध्वज लावल्याने गावात जातीय तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.सदरील बाबीचे गांभिर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित कासले यांनी गावातील सरपंच सिद्धार्थ पतंगे,उपसरपंच प्रतिनिधी बाबा पटेल,ज्येष्ठ नागरिक सज्जाद अली,साईनाथ शेट्टीवार,ज्ञानेश्वर मेडेकर, जमालोद्दीन शेख, शाहद शेख,व्यंकट पोरडवार,पोका इद्रिस बेग,चालक नागेंद्र कांबळे,यांच्या पुढाकारातून ग्राम पंचायतीत एक बैठक घेऊन गावात जातीय सलोखा कायम राखण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा व सार्वजनिक जागेचा वापर समाज हितासाठी चांगले उपक्रम राबवून करावा व एकमेकांच्या मनातील द्वेष भावना दूर करावे असे आवाहन केले.

या आवाहनाला प्रतिसाद तरुणांनी प्रतिसाद देत मुस्लिम,हिंदू,दलीत सर्व तरुण कार्यकर्त्यांनी आपआपले नामफलक व ध्वज काढून त्या ठिकाणी विविध वृक्षाचे वृक्षारोपण केले तर मुस्लिम तरुणांनी प्रवाश्यांना बैठक व्यवस्था व वृक्षारोपण केले.त्याच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कोतुक होत आहे..
 यावेळी व्यंकट जाधव, शेख शाहेद, राहुल शेट्टीवार, शेख सलमान, मलेश मेडेकर, शेख सदाम, साईनाथ कुशोड, शेख सिद्दिक, पवन शेट्टीवार, शेख अन्वर, मारोती कलमुर्गे, शेख शारून, शंकर म्याकलवार, अल्ताफ पाशामिया, श्रीकांत पोरडवार, शेख समीर, रमेश पालाकुर्तीवर, हणमंत शेट्टीवार आदी उपस्थित होते….
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या