लालवंडी येथे महादेव मंदिराच्या भंडाऱ्यात आंबलितुन 85 जनांना विषबाधा !

[ नायगाव प्रतिनिधी-गजानन चौधरी ]
लालवंडी येथे महादेव मंदिराच्या भंडाऱ्यात आंबलितुन 85 जनांना विषबाधा दीडशे लोकांना झाल्याची चर्चा होती परंतु प्रशासकीय रुग्णालयात 85 रुग्णांची नोंद असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक सोनकांबळे यांनी सांगितले.

लालवंडी येथे गावकऱ्यांच्या वतीने महादेवाचा भंडारा आमलीच्या कार्यक्रमात अंदाजे 85 जनांना विषबाधा झाल्याने काही रुग्णांना अति दक्षता विभागात,  बाकी रुग्णांना ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे उपचार चालू तर 12 रुग्णांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

तालुक्यातील लालवंडी येथे महादेव मंदिरात सार्वजनिक भाविकांच्या वतीने भंडाऱ्याचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बऱ्याच भाविकांनी महादेवाला आवडणारा आंबिलीचा महा प्रसाद म्हणून उन्हाळ्यात एनर्जी राहावी म्हणून महादेवाच्या प्रसाद घेऊन आले तर वरण-भात पोळीच्या भाजीचा महाप्रसादही भंडाराच्या जेवणात ठेवण्यात आला होता परंतु भाविकांनी महाप्रसाद घेतला यामध्ये ज्या भाविकांनी आंबील जास्त प्रमाणात घेतली त्याच भाविकांना विषबाधा झाल्याने त्या भाविकांना नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रात्रीपासून उपचारासाठी आणण्यात आले होते.

ज्यांची प्रकृती गंभीर आहे अशा रुग्णांना नांदेड येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले तर काहींना अति दक्षता विभाग येथे उपचारासाठी ठेवण्यात आले लालवंडी येथील विषबाधा झाल्याची माहिती समजतात लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायगावचे युवा नेते प्रा रवींद्र पाटील चव्हाण धनंजय पाटील चव्हाण श्रीधर पाटील चव्हाण श्रीनिवास पाटील चव्हाण जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिक्षण व आरोग्य सभापती संजय आप्पा बेळगे, नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या डॉ विद्या जैन व तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड मॅडम यांनी रुग्णालयातील विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेऊन चौकशी केली यावेळी भाजपाचे देविदास बोमनाळे, राजू बेळगे, डॉक्टर शिवाजीराव कागडे ,गंगाधर पाटील कल्याण विषबाधा झालेल्या रुग्णाची भेट घेऊन चौकशी केली तर चव्हाण परिवाराच्या वतीने रुग्णांना औषधाचे , चहा, बिस्कीट, पाणीचे वाटप करण्यात आले.

विशेष बाब म्हणजे नायगाव शहर हे तालुक्याचे गाव असून नांदेड हैदराबाद महामार्गावर असल्याने महामार्गावर अपघात झाल्यास लवकर उपचार प्राप्त व्हावा तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना वेळेवर व चांगला योग्य उपचार झाला पाहिजे म्हणून शासनाने ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर व ग्रामीण रुग्णालयाची करोडो रुपये खर्च करून नवीन इमारत उभारून जास्तीत जास्त गोरगरिब रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करीत असताना भोंगळ प्रशासकीय कारभारामुळे दररोज एक ते दोन डॉक्टरचे रुग्णांना उपचारासाठी उपस्थिती असते परंतु बाकी अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यावर अद्यापही कसल्यास प्रकारचे कार्यवाही न होत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात आलेले खाजगी डॉक्टरांच्या रुग्णालयात जाऊन उपचार घेत असल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नायगावा ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर असून वळंबा नसून खोळंबा असल्याची चर्चा होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या