नायगाव येथील पारंपारिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात साजरा !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळानंतर प्रथमच शेतकऱ्याने पारंपारिक पद्धतीने बैलपोळा बैलाला विविध प्रकारने सजवून वाजत गाजत मिरवणूक काढून, मारुती मंदिरांना प्रदक्षिणा घालून पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.

 

नायगाव येथील बैलपोळ्याच्या पारंपरिक पद्धतीने नाना मुकदम कल्याण कंपनी यांना असतो मुकादमाचे कल्याण परिवाराचे बैल हनुमान मंदिराचे दर्शन घेण्यासाठी बैलाला झुली घालून,  विविध प्रकारचे माळा घालून, वाजत गाजत ही मिरवणूक जुन्या गावातून कै बळवंतराव चव्हाण यांच्या घरापासून, तवकल शहाच्या दर्ग्या पासून, हनुमान मंदिराकडे जाऊन हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून वापस गावात फिरत त्यांच्या घराकडे वापस जात असतात यामध्ये शिंदे, चव्हाण, बोंमनाळे, बेळगे परिवारांचे बैल मंदिराकडे वाजत गाजत निघत निघत असतात.

 

यामध्ये केशवराव चव्हाण, माधव आप्पा बेळगे, हनमंतराव पा चव्हाण, संगमनाथ सावकार कवटीकवार, सुधाकर पा चव्हाण, श्रीनिवास पा चव्हाण, संजय आप्पा बेळगे, धनंजय पा चव्हाण, डॉ विश्वास चव्हाण, रवींद्र पा चव्हाण, बालाजी बच्चेवार, गजानन चौधरी, नारायण जाधव, श्रीधर पा चव्हाण, बालाजी शिंदे, माणिक चव्हाण, शिवाजी पा कल्याण, विठ्ठल आप्पा बेळगे, भास्कर पा चव्हाण, कैलास पा कल्याण, गंगाधर पा कल्याण, व्यंकट पा चव्हाण, प्रल्हाद पा बोंमनाळे, आदी सह संपूर्ण गावातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या