नायगाव येथील पानसरे नगरात अवैधरित्या विक्री होत असलेला 19 हजार रु. चा गुटखा जप्त !

[ नायगांव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
गुप्त माहीतीच्या आधारे शहरातील पानसरे नगरातील गुटखा विक्रेत्या च्या घरी धाड मारत नायगांव पोलीसांनी १९ हजाराचा गुटखा जप्त करत एकास आटक करून नायगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायगांव शहरातील ठोख आणि काही किरकोळ गुटखा विक्रत्यांकडून पोलीसाना चकमा देत लपुन मोटारसायकल वर नायगांव शहरासह तालुक्यात विविध गावात गुटखा विक्री चालु होती.
बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी गुप्त माहितीच्या आधारे नायगांव शहरातील गुटखा विक्रेते यादव चंद्रकांत कोकुलवार याच्या घरावर १७ सप्टेंबर रोजी धाड मारल्यावर विमल,एस . आर, ए.एम.ए. झेड एल असे विविध कंपनीचा १९ हजाराचा गुटखा त्याच्या घरात आडळुन आला. अनेक वर्षापासून यादव चंद्रकांत कोकुलवार पोलीसांना चकमा देत अवैध गुटख्याचा धंदा करत होता.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी नायगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे आणि त्यांची टीम ने खब-याच्या माहितीवरून शहरातील साईबाबा नगर येथील गुटखा विक्रत्याच्या घरावर धाड टाकल्याले नायगांव शहरातील गुटखा विक्रत्याचे धाबे दणाणले आहेत. पो.हे.का विलास मुक्तापुरे यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोध नायगांव पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानदे कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस आटक करण्यात आली आहे . या धाडीत विलास मुस्तापुरे, साई सांगवीकर, देविदास इंगोले, मिरा मेडके, चालक सुर्यकांत गुटे याचा कारवाई यशस्वी करण्यात सहभाग होता.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या