श्री.अर्चित चांडक सहाय्यक पोलिस अधिक्षक उपविभाग बिलोली यांची मुद्देमाल पकडून जुगार अड्ड्यावर ती मोठी कारवाई !

[ कुंटुर प्रतिनिधी- बालाजी हनमंते ]
 दिनांक 6. 9. 2022 रोजी माननीय श्री निसार तांबोळी पोलीस उपमहानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री.अर्चित चांडक सहाय्यक पोलिस अधिक्षक उपविभाग बिलोली यांनी हिंगोली जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हट्टा हद्दीत तुळजापूर वाडी शिवारात शेतातील आखाड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी छापा टाकून रोख रक्कम चार लाख अकरा हजार पाचशे दहा रुपये व 10 मोटर सायकल दोन चारचाकी वाहने तसेच 24 मोबाईल व पंचवीस आरोपी सह एकूण 20 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल पकडून जुगार अड्ड्यावर ती मोठी कारवाई केलेली आहे.
    सदर कारवाई कामी सपोनि दिघे, पोलीस उपनिरीक्षक येवले, पोलीस उपनिरीक्षक जोंधळे, पोलीस अमलदार भगवान कोतापल्ले, मारुती मुद्दमवार, चंद्रमणी सोनकांबळे, साईनाथ सांगवीकर, बाबू चरकु लवाड, पुणे बोईनवाड, सुनिता येडगे, रुद्रा कबाडे, अनिल सिद्धापुरे, असे होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या